ETV Bharat / sports

मध्य रेल्वेचा 'डंका' टोकियो ऑलम्पिकमध्ये वाजणार

टोकियो ऑलिम्पिकचे आयोजन २३ जुलै २०२१ ते ८ ऑगस्ट २०२१ दरम्यान होणार आहे. या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील चार खेळाडूंची राष्ट्रीय महिला हॉकी संघात निवड झाली आहे.

रेल्वेच्या चार खेळाडूंची महिला हॉकी संघात निवड
author img

By

Published : Jun 18, 2021, 7:46 PM IST

मुंबई - कोरोना विषाणूमुळे वर्षभर लांबणीवर टाकण्यात आलेल्या टोकियो ऑलिम्पिकचे आयोजन २३ जुलै २०२१ ते ८ ऑगस्ट २०२१ दरम्यान होणार आहे. या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील चार खेळाडूंची राष्ट्रीय महिला हॉकी संघात निवड झाली आहे.

Four players of Railways selected in women's hockey team
मध्य रेल्वेचा 'डंका' टोकियो ऑलम्पिकमध्ये वाजणार

चार महिला खेळाडूंची टोकियो ऑलिम्पिकमध्ये निवड-

भारतीय रेल्वेने आजतागायत कला विश्वात अनेक कलाकार, क्रीडाविश्वात अनेक खेळाडू दिले आहे. अनेकांनी ऑलिम्पिक स्पर्धेत भारतचं नाव सुवर्ण अक्षरात कोरले आहे. यंदाचा टोकियो ऑलिम्पिक २०२१ मध्ये अनेक भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील चार खेळाडूंची राष्ट्रीय महिला हॉकी संघात निवड झाली आहे. मध्य रेल्वेसाठी ही बाब अभिमानास्पद आहे. कारण टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघातील १६ सदस्यांच्या संघात मध्य रेल्वेच्या ४ खेळाडूंच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

१३ खेळाडू भारतीय रेल्वेमधील-

१६ सदस्यांच्या भारतीय महिला हॉकी संघातील १३ खेळाडू भारतीय रेल्वेमध्ये कार्यरत आहेत. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात तिकिट तपासणी संवर्गात काम करणारे चारही खेळाडू मोनिका मलिक हेड टीसी, वंदना कटारिया हेड टीसी, सुशिला चानू पुखरांबम् हेड टीसी आणि स्टँड-इन गोल कीपर रजीनी एतिमारपु हेड टीसी यांची भारतीय ऑलिम्पिक महिला हॉकी संघात निवड झाली आहे. या खेळाडू गेल्या काही वर्षांपासून मध्य रेल्वेकडून सराव आणि खेळत आहेत. यांच्या प्रशिक्षक हेलन मेरी (अर्जुन पुरस्कार प्राप्त) आणि सरिता ग्रोव्हर असून त्या मध्य रेल्वेत कार्यरत असून त्या राष्ट्रीय हॉकीपटू होत्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.