चंडीगढ - भारताचे माजी हॉकीपटू बलबीर सिंग (धाकटे) यांचे निधन झाले. ते ८८ वर्षाचे होते. १९५८च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या भारतीय हॉकी संघाचे ते सदस्य होते.
बलबीर यांच्या निधनाची बातमी त्यांची मुलगी मनदीप सामरा यांनी मंगळवारी दिली. बलबीर यांचा मुलगा कॅनडात निवासास असून, कोरोनाच्या साथीमुळे तो अंत्यसंस्काराला येऊ शकला नाही. बलबीर यांच्या पश्चात पत्नी, मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे.
बलबीर यांचा जन्म २ मे १९३२ या दिवशी जालंधर येथील संसारपूर येथे झाला. जालंधरमधील लायॉलपूर खालसा महाविद्यालयात त्यांचे शिक्षण झाले. १९५१मध्ये त्यांची भारतीय हॉकी संघात प्रथमच निवड झाली. १९६२मध्ये ते सेना दलात अधिकारीपदावर रुजू झाले. राष्ट्रीय स्पर्धेतही त्यांनी सेना दलाचे प्रतिनिधित्व केले. १९८४मध्ये निवृत्त झाले आणि ते चंडीगढमध्येच स्थायिक झाले.
हेही वाचा - Exclusive: माजी हॉकीपटू धनराज पिल्ले यांच्याशी नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम विषयावरुन खास बातचित
हेही वाचा - ओडिशात उभे राहत आहे देशातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियम