नवी दिल्ली - इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या मालिकेत, भारतीय महिला हॉकी संघाचा ग्रेट ब्रिटनच्या संघाने चौथ्या सामन्यात ३-१ ने पराभव केला. आज बुधवारी झालेल्या सामन्यात भारतीय संघाचा ब्रिटनच्या संघासमोर टिकाव लागला नाही. भारतीय संघाने मालिकेतील तिसरा सामना अनिर्णित राखला होता. मात्र, चौथ्या सामन्यात यजमान संघाने बाजी मारली.
ग्रेट ब्रिटनच्या संघाने, सामन्याच्या ५, २९, आणि ५० व्या मिनिटाला गोल करत सामना जिंकला. तर भारताकडून नेहाने १८ व्या मिनिटाला एकमात्र गोल केला.
-
FT: 🇬🇧 3-1 🇮🇳
— Hockey India (@TheHockeyIndia) October 2, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Tough luck, but we shall come back stronger in the last #GBRvIND fixture on 4th October, 2019 at 2:00 PM (IST).#IndiaKaGame #EnglandTour pic.twitter.com/8dZJkqThE8
">FT: 🇬🇧 3-1 🇮🇳
— Hockey India (@TheHockeyIndia) October 2, 2019
Tough luck, but we shall come back stronger in the last #GBRvIND fixture on 4th October, 2019 at 2:00 PM (IST).#IndiaKaGame #EnglandTour pic.twitter.com/8dZJkqThE8FT: 🇬🇧 3-1 🇮🇳
— Hockey India (@TheHockeyIndia) October 2, 2019
Tough luck, but we shall come back stronger in the last #GBRvIND fixture on 4th October, 2019 at 2:00 PM (IST).#IndiaKaGame #EnglandTour pic.twitter.com/8dZJkqThE8
हेही वाचा - महिला हॉकी : इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी राणी रामपालकडे टीम इंडियाचे कर्णधारपद
सामन्यात पहिल्या मिनिटांपासून यजमान संघाने आक्रमक खेळ केला. ५ व्या मिनिटालाच ब्रिटनच्या हनाहने गोल करत संघाला १-० ने आघाडी मिळवून दिली. तेव्हा भारताच्या नेहाने १८ व्या मिनिटाला गोल करत सामना १-१ ने बरोबरीत आणला. यानंतर मात्र, भारतीय संघाने यजमानांच्या आक्रमणासमोर गुडघे टेकले.
चार्लोटेने २९ व्या मिनिटाला गोल करत संघाला २-१ ने आघाडी मिळवून दिली आणि गिसेले हिने ५० व्या मिनिटाला गोल करत संघाला ३-१ च्या स्थितीत आणले. भारतीय संघाला यजमान संघाची बचाव फळी भेदण्यात अपयश आले.
हेही वाचा - हॉकी : भारतीय संघाने उडवला विश्वविजेता बेल्जियमचा २-० धुव्वा