मँचेस्टर - इंग्लिश प्रीमियर लीग क्लब मँचेस्टर युनायटेडने फुटबॉलपटू एडिन्सन कवानी आणि फाकुंडा पेलिस्ट्रीशी करार केला आहे. कवानीने क्लबबरोबर एक वर्षाचा करार केला आहे. कवानीला हा करार वाढवण्याची तरतूद आहे. पेलिस्ट्रीने पाच वर्षांच्या करारावर स्वाक्षरी केली असून त्याच्या करारामध्येही एका वर्षाची मुदतवाढ आहे.
कवानीने फ्रान्स लीग आणि इटलीच्या सेरी-ए लीगमध्ये गोल्डन बूट पुरस्कार जिंकला आहे. २००७पासून युरोपमध्ये आल्यापासून त्याने युईएफए चॅम्पियन्स लीगमधील ३५ गोलसह एकूण ३४१ गोल केले आहेत. कवानीने फ्रान्सच्या पॅरिस सेंट जर्मेन क्लबसह २०० गोल आणि सहा लीग विजेतेपदे पटकावली आहेत. पॅरिस सेंट जर्मेनकरिता तो सर्वाधिक गोल नोंदवणारा खेळाडू आहे.
-
🇫🇷 Paris ➡️ Manchester 🏴
— Manchester United (@ManUtd) October 5, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
The next stop on @ECavaniOfficial's journey is 𝙐𝙣𝙞𝙩𝙚𝙙.#MUFC pic.twitter.com/dzM78jXzqX
">🇫🇷 Paris ➡️ Manchester 🏴
— Manchester United (@ManUtd) October 5, 2020
The next stop on @ECavaniOfficial's journey is 𝙐𝙣𝙞𝙩𝙚𝙙.#MUFC pic.twitter.com/dzM78jXzqX🇫🇷 Paris ➡️ Manchester 🏴
— Manchester United (@ManUtd) October 5, 2020
The next stop on @ECavaniOfficial's journey is 𝙐𝙣𝙞𝙩𝙚𝙙.#MUFC pic.twitter.com/dzM78jXzqX
आंतरराष्ट्रीय स्तरावर उरुग्वेसाठी त्याने कोपा अमेरिका स्पर्धेचे जेतेपद जिंकले असून देशासाठी खेळल्या गेलेल्या ११६ सामन्यात ५० गोल केले आहेत. तर, पेलिस्ट्रीने उरुग्वेच्या प्रीमियर डिव्हिजन लीग क्लब अॅटलिटिको पेनारोईसह ३७ सामने खेळले आहेत.
मँचेस्टर युनायटेड सध्याच्या मोसमात गुणतालिकेत १६व्या स्थानावर आहे. त्यांचा सामना १७ ऑक्टोबर रोजी न्यूकॅसलशी होईल.