बार्सिलोना - चॅम्पियन्स लीगमध्ये उपांत्यपूर्व फेरीत झालेल्या सामन्यात बार्सिलोनाने मँचेस्टर युनायटेडचा ३-० ने पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या सामन्याच बार्सिलोनासाठी अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लियोनेल मेस्सीने २ गोल दागत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. उपांत्य फेरीत बार्सिलोनाचा सामना लिव्हरपूलशी होणार आहे.
बार्सिलोनाच्या मेस्सीने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत सामन्याच्या १६ व्या मिनिटाला गोल करत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. तर ४ मिनिटाच्या फरकाने २० व्या मिनिटाला मेस्सीने दुसरा गोल केला. यानंतर 61व्या मिनिटाला कॉटिन्होने गोल करत बार्सिलोनाला ३-० अशी विजयी आघाडी मिळवून दिली. मँचेस्टर युनायटेडला या सामन्यात एकही गोल करता आला नाही.
-
💫 THE FINAL FOUR 💫
— UEFA Champions League (@ChampionsLeague) April 17, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
🇳🇱 Ajax
🇪🇸 Barcelona
🏴 Liverpool
🏴 Tottenham #UCL pic.twitter.com/ebZv7oPsNr
">💫 THE FINAL FOUR 💫
— UEFA Champions League (@ChampionsLeague) April 17, 2019
🇳🇱 Ajax
🇪🇸 Barcelona
🏴 Liverpool
🏴 Tottenham #UCL pic.twitter.com/ebZv7oPsNr💫 THE FINAL FOUR 💫
— UEFA Champions League (@ChampionsLeague) April 17, 2019
🇳🇱 Ajax
🇪🇸 Barcelona
🏴 Liverpool
🏴 Tottenham #UCL pic.twitter.com/ebZv7oPsNr
बार्सिलोनाने पहिल्या लेगमध्ये मँचेस्टर युनायटेडला १-० अशा फरकाने पराभूत केले होते.