पॅरिस - स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने बार्सिलोनाची साथ सोडत पॅरिस सेंट जर्मेन क्लबशी करार केला आहे. तो या क्लबकडून खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. शनिवारी त्याने जोरदार सराव केला.
लीग 1 स्पर्धेच्या पहिल्या तीन सामन्यात लिओनेल मेस्सी खेळला नव्हता. पण आज रविवारच्या सामन्यात तो पॅरिस सेंट जर्मेन क्लबकडून खेळताना पाहायला मिळेल. दरम्यान, मेस्सीला फ्रान्समध्ये स्थायिक होण्यासाठी वेळ मिळावा तसेच तो फिट राहावा यासाठी क्लबने त्याला पहिल्या तीन सामन्यात आराम दिला होता.
लिओनेल मेस्सीचा बार्सिलोनाचा माजी सहकारी नेमार देखील आंतरराष्ट्रीय सामन्यामुळे सुरूवातीचे काही सामने खेळू शकला नव्हता. आता तो या हंगामात खेळणार आहे.
कायलेन एमबाप्पे याने देखील शनिवारी सराव सत्रात भाग घेतला. तो या क्लबकडून अखेरचा सामना खेळणार आहे. यानंतर तो रिअल माद्रिदसोबत भविष्यात जोडला जाण्याची शक्यता आहे. पण फ्रान्सच्या एका रिपोर्टनुसार, पॅरिस सेंट जर्मेन क्लबने रिअल माद्रिदच्या प्रस्तावाला नकार दिला आहे. या प्रस्तावाची किंमत 170 मिलियन यूरो इतकी आहे.
दरम्यान, लीग 1 स्पर्धेत पॅरिस सेंट जर्मेनचा क्लब अव्वल स्थानावर आहे. त्यांनी तीन सामन्यात विजय मिळवले आहेत. यात त्यांनी 10 गोल केले.
हेही वाचा - Tokyo Paralympics: भाविनाबेन पटेलच्या 'रुपेरी' कामगिरीचे अभिनव बिद्राने केलं कौतुक, म्हणाला...
हेही वाचा - Tokyo Paralympics : उंच उडीत निषाद कुमारची कमाल, देशाला जिंकून दिलं दुसरे रौप्य पदक