ब्यूनस आयर्स - अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लियोनेल मेस्सीवर एक मोठी नामुष्की ओढवली आहे. मेस्सीवर तीन महिन्यापर्यंत फूटबॉल खेळण्यास बंदी घालण्यात आली आहे. कोपा अमेरिका स्पर्धेदरम्यान केलेले एक वक्तव्य त्याला खूपच महाग पडले आहे.
कोपा अमेरिकेत खेळल्या गेलेल्या चिलीविरुद्धच्या सामन्यात मेस्सीला लाल कार्ड मिळाले होते. त्यानंतर त्याने, 'ही स्पर्धा ब्राझीलसाठी फिक्स केली आहे' असे म्हटले होते.
३२ वर्षीय मेस्सीवर या बंदीव्यतिरिक्त कॉनमेबॉल या संस्थेने ५०००० डॉलर्सचा दंडही ठोठावला आहे. या बंदीमुळे मेस्सीला सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या चिली, जर्मनी आणि मेक्सिको विरुद्ध होणाऱ्या सामन्यांमध्ये खेळता येणार नाही.