नवी दिल्ली - भारतातील प्रमुख फुटबॉल स्पर्धा आय-लीगचा यंदाचा हंगाम कोलकाता येथे पार पडणार आहे. शुक्रवारी लीग समितीबरोबर झालेल्या बैठकीनंतर अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) हा निर्णय घेतला.
-
#HeroILeague and #Hero2ndDiv Qualifiers to be held in Kolkata 🏟️
— Hero I-League (@ILeagueOfficial) August 14, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read more ▶️ https://t.co/SKz7qtVJlZ#IndianFootball ⚽️ pic.twitter.com/loE5Y7KSfc
">#HeroILeague and #Hero2ndDiv Qualifiers to be held in Kolkata 🏟️
— Hero I-League (@ILeagueOfficial) August 14, 2020
Read more ▶️ https://t.co/SKz7qtVJlZ#IndianFootball ⚽️ pic.twitter.com/loE5Y7KSfc#HeroILeague and #Hero2ndDiv Qualifiers to be held in Kolkata 🏟️
— Hero I-League (@ILeagueOfficial) August 14, 2020
Read more ▶️ https://t.co/SKz7qtVJlZ#IndianFootball ⚽️ pic.twitter.com/loE5Y7KSfc
आय-लीगचे सेकंड डिव्हिजनचे सामनेही कोलकात्यात होणार आहेत. एआयएफएफने म्हटले आहे, की केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी झाल्यानंतर हीरो सेकंड डिव्हिजन पात्रता आणि हीरो आय-लीगचे वेळापत्रक आणि तारीख निश्चित केली जाईल. एआयएफएफचे उपाध्यक्ष सुब्रत दत्ता म्हणाले, की सामन्यांसाठी बायो-बबल तयार करण्यासाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी) तयार करण्यात आली आहे.
ते पुढे म्हणाले, ''सध्या आम्ही सर्व अडचणीविरूद्ध काम करत आहोत. आम्हाला अनेक कार्यशाळा घेण्याची गरज आहे. देशातील फुटबॉल प्रेमींच्या अपेक्षांचे पालन करण्यासाठी मानकांचे पालन केले पाहिजे. दुसऱ्यांसाठी आदर्श निर्माण होईल, अशा पद्धतीने लीगचे आयोजन केले जाणे अपेक्षित आहे.''
देशभरात फोफावत चाललेल्या कोरोना व्हायरसमुळे मे महिन्यात आय-लीग सामन्यांसह इतर सर्व फुटबॉल स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या होत्या.