ETV Bharat / sports

पॉल पोग्बाच्या कराराला वर्षभराची मुदतवाढ - manchester united latest news

इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये (ईपीएल) या मोसमात आतापर्यंत तीनही सामन्यांमध्ये पोग्बा संघात होता. एका वृत्तानुसार, पोग्बा आता २०२२पर्यंत क्लबमध्ये असेल.

football club manchester united extended paul pogba's contract
पॉल पोग्बाच्या कराराला वर्षभराची मुदतवाढ
author img

By

Published : Oct 17, 2020, 5:24 PM IST

लंडन - इंग्लंड फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेडने आपला स्टार खेळाडू पॉल पोग्बाच्या कराराला वर्षभरासाठी मुदतवाढ दिली आहे. एका वृत्तानुसार, पोग्बा आता २०२२पर्यंत क्लबमध्ये असेल. यंदाच्या हंगामानंतर पोग्बाचा करार संपुष्टात येणार होता.

इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये (ईपीएल) या मोसमात आतापर्यंत तीनही सामन्यांमध्ये पोग्बा संघात होता. स्पॅनिश लीग रियल मद्रिदबरोबर खेळण्याचे स्वप्न असल्याचे पोग्बाने कोरोनाकाळातील ब्रेकदरम्यान सांगितले होते. पोग्बाचा करार वाढवण्याचा निर्णय काही आठवड्यांपूर्वी घेण्यात आला होता.

फ्रान्सच्या वर्ल्डकप विजेत्या संघाचा सदस्य असलेला पोग्बा २०१६मध्ये इटलीच्या जुव्हेंटस येथून मँचेस्टर युनायटेड क्लबमध्ये दाखल झाला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.