बर्लिन - जेडन सांचोच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर बोरूशिया डॉर्टमंडने पेडरबॉर्नचा पराभव केला. बुंडेस्लिगा लीगच्या 29व्या फेरीच्या सामन्यात डॉर्टमंडने हा सामना 6-1ने खिशात घातला. रविवारी खेळल्या गेलेल्या या सामन्याच्या पूर्वार्धात दोन्ही संघांमध्ये चांगलीच टक्कर पाहायला मिळाली. सामन्याचे पहिले सत्र गोलरहित राहिले होते.
दुसऱ्या सत्रात थॉर्गन हॅझार्डने डॉर्टमंडचे खाते उघडले. तीन मिनिटांनंतर सांचोने सामन्यात आपला पहिला गोल नोंदवून डॉर्टमंडची आघाडी दुप्पट केली. सामन्यात दोन गोलने पिछाडीवर आल्यानंतर पेडबॉर्ननेही आपले खाते उघडले. उवे हुमेयरने पेनल्टीवर गोल केला. त्यानंतर, 74व्या मिनिटाला सांचो आणि 85 व्या मिनिटाला अशरफ हकीमीने डॉर्टमंडसाठी गोल केले. 89 व्या मिनिटाला मार्सेल शमेलझर आणि सांचोने वैयक्तिक तिसरा गोल करत सामना 6-1 असा जिंकला.
दुसर्या सामन्यात, बोरुशिया मोनचेंगलेदबाकने युनियन बर्लिनचा 4-1 असा पराभव केला.