कुइबा (ब्राझील) - लिओनेल मेस्सीने केलेल्या दोन गोलच्या जोरावर अर्जेटिनाने कोपा अमेरिका २०२१ स्पर्धेत बोलिवियाचा ४-१ ने धुव्वा उडवला. मेस्सीच्या संघाचा या स्पर्धेतील आपल्या चार सामन्यांपैकी हा तिसरा विजय आहे. त्याच्या खात्यात १० गुण असून ते ग्रुप 'ए' मध्ये अव्वलस्थानी आहेत.
बोलिवियाकडून सामन्यात एकमात्र गोल एर्विन सावेद्रा याने केला. तर अर्जेटिनाकडून एलेजांद्रोने ६व्या मेस्सीने ३२ आणि ४२व्या मिनिटाला गोल केला. मेसीने ३२ मिनिटाचा गोला त्याने पेनाल्टीवर केला.
दुसरीकडे उरुग्वेने आपल्या चौथ्या सामन्यात पॅराग्वेचा १-० ने पराभव केला. उरूग्वेकडून एकमात्र गोल ३१व्या मिनिटाला एडिसन कवानी याने केला.
हेही वाचा - ICC T20 WC : टी-२० विश्वकरंडकाबाबत जय शाह यांची मोठी घोषणा
हेही वाचा - Euro Cup २०२० : विश्वविजेता फ्रान्स स्पर्धेबाहेर; स्वित्झर्लंडने पेनाल्टी शूटऑउटमध्ये उडवला धुव्वा