मिलान - ब्राझीलचे दिग्गज माजी फुटबॉलपटू पेले यांनी घातलेल्या शेवटच्या जर्सीचा लिलाव इटलीमध्ये पार पडला. लिलावामध्ये या जर्सीला तब्बल ३३,००० डॉलर्स (२३.५ लाख ) एवढी किंमत मिळाली आहे. पेले सध्या ७९ वर्षांचे असून त्यांचा उल्लेख 'फुटबॉलच्या दुनियेतला जादूगार' असाही केला जातो.
-
Pele jersey of his last international match auctioned for 30,000 euros https://t.co/jgLk9Datlu pic.twitter.com/tshLzpgVId
— Goals News (@Goalsncom) December 6, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Pele jersey of his last international match auctioned for 30,000 euros https://t.co/jgLk9Datlu pic.twitter.com/tshLzpgVId
— Goals News (@Goalsncom) December 6, 2019Pele jersey of his last international match auctioned for 30,000 euros https://t.co/jgLk9Datlu pic.twitter.com/tshLzpgVId
— Goals News (@Goalsncom) December 6, 2019
हेही वाचा - बारामतीचे सतीश ननवरे तिसऱ्यांदा 'आयर्नमॅन'
जुलै १९७१ मध्ये रिओ दि जानेरो मधील मर्काना स्टेडियमवर झालेल्या मैत्रीपूर्ण सामन्यादरम्यान तीन वेळा विश्वकरंडक जिंकलेल्या पेले यांनी युगोस्लाव्हियाविरूद्ध ही जर्सी परिधान केली होती. ब्राझीलसाठी पेले यांचा हा शेवटचा सामना होता.
ब्राझीलकडून त्यांनी ९२ सामन्यांत ७७ गोल केले आहेत. याच लिलावात, १९८९-९० च्या सत्रात दिग्गज डिएगो मॅराडोना यांनी परिधान केलेली जर्सी ७५०० युरोला विकली गेली आहे. अमेरिकन बास्केटबॉल खेळाडू मायकेल जॉर्डनने बेसबॉल खेळताना वापरलेली बॅट ४२५ युरोमध्ये विकली गेली आहे.