मुंबई - ब्राझील आणि अर्जेंटिना यांच्यातील विश्व कप पात्रता फेरीचा सामना अचानक स्थगित करण्यात आला आहे. या सामन्यात कोरोना प्रोटोकॉलचे पालन न करणाऱ्या तीन खेळाडूंना बाहेर काढण्यासाठी स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांना थेट मैदानात यावं लागलं. दरम्यान, उभय संघातील सामन्यात अर्जेंटिनाकडून लिओनेल मेस्सी तर ब्राझीलकडून नेमार खेळत होता. पण सातव्या मिनिटाला सामना अचानक थांबवण्यात आला. तोपर्यंत दोन्ही संघाला गोल करण्यात यश आलेलं नव्हतं.
खेळाडू, प्रशिक्षक, फुटबॉल अधिकारी आणि स्थानिक अधिकारी यांच्यात खूप वाद झाला. ब्राझीलच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे की, अर्जेंटिनाचे तीन खेळाडू इंग्लंडमध्ये राहत आहेत. त्या खेळाडूंना क्वारंटाईन राहायला सांगितलं होते. परंतु ते सामना खेळत आहेत. फीफा पात्रता फेरीविषयात पुढे काय करावं हा निर्णय घेईल.
ब्राझीलची आरोग्य एजन्सीचे अध्यक्ष अंतोनियो बारा टोरेस यांनी सांगितलं की, ब्राझीलचे कोरोना प्रोटोकॉल मोडल्यामुळे अर्जेंटिनाच्या त्या सर्व खेळाडूंवर दंडाची कारवाई केली जाईल. तसेच त्यांना माघारी पाठवण्यात येईल. चार खेळाडूंना क्वारंटाईनमध्ये राहण्यास सांगण्यात आले होते. यातील तिघे सामना खेळण्यासाठी मैदानात उतरले होते. तेव्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी थेट मैदानावर येत सामना थांबवला.
हेही वाचा - सचिन तेंडुलकर पत्नी अंजलीसह करतोय ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची सफर
हेही वाचा - जसप्रीत बुमराहचे 'प्लेयर ऑफ द मंथ' पुरस्कारासाठी नामांकन, हे खेळाडू शर्यतीत