नवी दिल्ली - वूमन्स चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्यामध्ये बार्सिलोना संघाने चेल्साचा ४-० असा धुव्वा उडवत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. २००९ पासून ते आतापर्यंतच्या वूमन चॅम्पियन्स लीगमध्ये बार्सिलोना महिलांनी पहिल्यांदाच जेतेपद मिळवले आहे.
रविवारी रंगलेल्या सामन्यात बार्सिलोनाच्या संघाने सुरूवातीपासूनच शानदार खेळ केला. त्यांनी प्रतिस्पर्धी चेल्सा संघातील महिलांना बॅकफूटवर ठेवले. बार्सोलोनाच्या महिलांनी पासिंग आणि मिळालेल्या संधीच गोलमध्ये रुपांतरित केलं. या सामन्यात इंग्लंडचा क्लब सामन्यात सुरुवातीपासून शेवटपर्यंत संघर्ष करताना दिसला.
-
⛰ You've reached the summit, @FCBfemeni! 🏆
— FC Barcelona (@FCBarcelona) May 17, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Thanks to @stanleytools for supporting us throughout the season! pic.twitter.com/LZAq5hKOV1
">⛰ You've reached the summit, @FCBfemeni! 🏆
— FC Barcelona (@FCBarcelona) May 17, 2021
Thanks to @stanleytools for supporting us throughout the season! pic.twitter.com/LZAq5hKOV1⛰ You've reached the summit, @FCBfemeni! 🏆
— FC Barcelona (@FCBarcelona) May 17, 2021
Thanks to @stanleytools for supporting us throughout the season! pic.twitter.com/LZAq5hKOV1
सामन्याच्या पहिल्याच मिनिटात लाइके मार्टन्स हिने मारलेला फटका गोल पोस्टला जाऊन परत आला. तेव्हा फर्न किर्बी हिने चपळाईने चेंडू पुन्हा कव्हर केला आणि गोल पेस्टमध्ये ढकलत बार्सिलोनाचे खाते उघडले. १४ व्या मिनिटात पेनल्टीची संधी साधत अलेक्सिया पुटेल्लासने संघाला दुसरा गोल मिळवून दिला आणि बार्सिलोनाला २-० अशी आघाडी भक्कम मिळवून दिली.
-
⛰ You've reached the summit, @FCBfemeni! 🏆
— FC Barcelona (@FCBarcelona) May 17, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Thanks to @stanleytools for supporting us throughout the season! pic.twitter.com/LZAq5hKOV1
">⛰ You've reached the summit, @FCBfemeni! 🏆
— FC Barcelona (@FCBarcelona) May 17, 2021
Thanks to @stanleytools for supporting us throughout the season! pic.twitter.com/LZAq5hKOV1⛰ You've reached the summit, @FCBfemeni! 🏆
— FC Barcelona (@FCBarcelona) May 17, 2021
Thanks to @stanleytools for supporting us throughout the season! pic.twitter.com/LZAq5hKOV1
चेल्सा संघातील फॉरवर्ड स्ट्राँग दिसला तरी डिफेन्समध्ये ढिलाई त्यांना चांगलीच महागात पडली. दुसऱ्या गोलच्या सातव्या मिनिटानंतर आयताना बोनमाती हिने गोल पेस्ट जवळ चेंडू आल्यानंतर त्या संधीचे रुपांतर गोलमध्ये केले. कारोलिन ग्राहम हेनसन हिने ३६व्या मिनिटाला लिएकी मर्टन्सच्या सुरेश पासवर चौथा गोल केला. अखेरपर्यंत चेल्साच्या महिलांना एकही गोल करता आला नाही.
हेही वाचा - पीएसजी क्लबसोबत राहणार, नेमारची स्पष्टोक्ती
हेही वाचा - मँचेस्टर सिटीने १०वर्षांत पटकावलं ५व्यांदा प्रीमियर लीगचे विजेतेपद