ETV Bharat / sports

सुआरेझचा 'बायसायकल' गोल, बार्सिलोनाची सेविलावर ४-० ने मात

author img

By

Published : Oct 7, 2019, 1:58 PM IST

या विजयामुळे बार्सिलोनाने स्पर्धेमध्ये दुसऱ्या स्थानी झेप घेतली. स्पर्धेत माद्रिदचा संघ बार्सिलोनापेक्षा दोन गुणांनी पुढे आहे. सामन्याच्या पहिल्या सत्रात मिळालेल्या संधींचा फायदा सेविला संघाला उठवता आला नाही. याउलट, बार्सिलोनाने मात्र पहिल्या सत्रात तीन गोल केले.

सुआरेझचा 'बायसायकल' गोल, बार्सिलोनाची सेविलावर ४-० ने मात

बार्सिलोना - सध्या सुरु असलेल्या 'ला लीगा' स्पर्धेमध्ये दिग्गज संघ बार्सिलोनाने सेविलावर ४-० ने मात केली. कॅम्प नाऊ स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात स्टार खेळाडू लुईस सुवारेझने 'बायसायकल' गोल झळकावत चाहत्यांचा आनंद द्विगुणित केला.

हेही वाचा - विजय हजारे स्पर्धेत गोलंदाजाचा कारनामा, संघाच्या ७ फंलदाजांना धाडले माघारी

सामन्याच्या २७ व्या मिनिटाला सुवारेझने संघासाठी खाते उघडले. खेळाडू नेल्सन सेमेडोने दिलेल्या पासवर सुवारेझने अप्रतिम 'बायसायकल' गोल झळकावला. पाच मिनिटानंतर, अटुोरो विडालने संघासाठी दुसरा गोल झळकावला. विडालने केलेल्या गोलच्या तीन मिनिटानंतर, डेम्बेलेने तिसरा गोल करत संघाचा विजय निश्चित केला.

सामन्याच्या दुसऱ्या सत्रात, सेविलाच्या आक्रमक खेळाचा उपयोग झाला नाही. फुटबॉलविश्वातील दिग्गज खेळाडू आणि यंदाच्या फिफा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळालेल्या मेस्सीने ७८ व्या मिनिटाला गोल झळकावत सामन्याचा शेवट गोड केला. सामना संपण्यापूर्वी रोनाल्ड अराउजो आणि डेम्बेलेला मिळालेल्या लाल कार्डामुळे बार्सिलोनाचे नऊ खेळाडू मैदानात होते.

Intro:Body:

barcelona beat sevilla by 4-0 in la liga

barcelona beat sevilla news, barcelona beat sevilla by 4-0, barcelona and sevilla news, la liga latest news, barcelona latest news

सुआरेझचा 'बायसायकल' गोल, बार्सिलोनाची सेविलावर ४-० ने मात

बार्सिलोना - सध्या सुरु असलेल्या ला लीगा स्पर्धेमध्ये दिग्गज संघ बार्सिलोनाने सेविलावर ४-० ने मात केली. कॅम्प नाऊ स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात स्टार खेळाडू लुईस सुवारेझने 'बायसायकल' गोल झळकावत चाहत्यांचा आनंद द्विगुणित केला. 

हेही वाचा - 

या विजयामुळे बार्सिलोनाने स्पर्धेमध्ये दुसऱ्या स्थानी झेप घेतली. स्पर्धेत माद्रिदचा संघ बार्सिलोनापेक्षा दोन गुणांनी पुढे आहे. सामन्याच्या पहिल्या सत्रात मिळालेल्या संधींचा फायदा सेविला संघाला उठवता आला नाही. याउलट, बार्सिलोनाने मात्र पहिल्या सत्रात तीन गोल केले.

सामन्याच्या २७ व्या मिनीटाला सुवारेझने संघासाठी खाते उघडले. खेळाडू नेल्सन सेमेडोने दिलेल्या पासवर सुवारेझने अप्रतिम 'बायसायकल' गोल झळकावला. पाच मिनिटानंतर, अटुोरो विडालने संघासाठी दुसरा गोल झळकावला. विडालने केलेल्या गोलच्या तीन मिनिटानंतर, डेम्बेलेने तिसरा गोल करत संघाचा विजय निश्चित केला.

सामन्याच्या दुसऱ्या सत्रात, सेविलाच्या आक्रमक खेळाचा उपयोग झाला नाही. फुटबॉलविश्वातील दिग्गज खेळाडू आणि यंदाच्या फिफा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळालेल्या मेस्सीने ७८ व्या मिनिटाला गोल झळकावत सामन्याचा शेवट गोड केला. सामना संपण्यापूर्वी रोनाल्ड अराउजो आणि डेम्बेलेला मिळालेल्या लाल कार्डामुळे बार्सिलोनाचे नऊ खेळाडू मैदानात होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.