ETV Bharat / sports

आर्सेनलने पटकावला 14 वा एफए चषक - Arsenal beat chelsea in fa cup

सामन्याच्या पाचव्या मिनिटाला क्रिस्टियन पुलिसिकने गोल करून चेल्सीला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. एफए चषकाच्या अंतिम सामन्यात गोल नोंदवणारा तो पहिला अमेरिकन खेळाडूही ठरला. त्यानंतर आउबामेयांगने आर्सेनलसाठी 28 व्या मिनिटाला बरोबरी साधली. आउबामेयांगने पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर केले आणि आपल्या संघाला बरोबरीत आणले.

Arsenal beat chelsea by 2-1 to win their 14th fa cup title
आर्सेनलने पटकावला 14 वा एफए चषक
author img

By

Published : Aug 2, 2020, 2:59 PM IST

लंडन - दिग्गज फुटबॉल क्लब आर्सेनलने चेल्सीचा 2-1 असा पराभव करत 14 वा एफए चषक आपल्या नावावर केला. वेम्बली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात आर्सेनलचा कर्णधार पियरे एमरिक आउबामेयांगने दोन गोल करत संघाला विजेतेपद मिळवून दिले.

सामन्याच्या पाचव्या मिनिटाला क्रिस्टियन पुलिसिकने गोल करून चेल्सीला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली होती. एफए चषकाच्या अंतिम सामन्यात गोल नोंदवणारा तो पहिला अमेरिकन खेळाडू ठरला. त्यानंतर आउबामेयांगने आर्सेनलसाठी 28 व्या मिनिटाला बरोबरी साधली. आउबामेयांगने पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर केले आणि आपल्या संघाला बरोबरीत आणले.

त्यानंतर 67 व्या मिनिटाला आउबामेयांगने आपला दुसरा गोल केला. या गोलनंतर चेल्सीने पुनरामनासाठी जोरदार प्रयत्न केले मात्र, ते अपयशी ठरले. आर्सेनल हा या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहे. त्यानंतर, मँचेस्टर युनायटेडने 12 वेळा हा चषक जिंकला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.