नवी दिल्ली - यंदाच्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत अर्जेंटिना आणि उरुग्वे संघाने धडक मारली आहे. अ-गटामध्ये पेरू संघाला तिसऱ्या स्थानावर तर क-गटात उरुग्वेला दुसरे स्थान मिळवता आले.

रविवारी झालेल्या सामन्यात अर्जेंटिनाने कतारवर २-० असा विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात प्रवेश केला. त्यामुळे कतारला आता या स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे. अर्जेंटिनाच्या लॉटारो मार्टिनेझने सामन्याच्या चौथ्या मिनिटाला पहिला आणि सर्जिओ एग्युरोने ८२व्या मिनिटाला दुसरा गोल केला. उपांत्यपूर्व फेरीत अर्जेंटिनाला व्हेनेझुएला संघाशी भिडावे लागणार आहे.

ब-गटामधून कोलंबियाने पॅराग्वेला १-० असे हरवत उपांत्यपूर्व फेरी गाठली.