हरारे - बांगलादेशने झिम्बाब्वेचा एकमात्र कसोटी सामन्यात २२० धावांनी पराभव केला. झिम्बाब्वचे दुसरा डाव २५६ धावांवर आटोपला. बांगलादेशचे गोलंदाज मेहदी हसन मिराज आणि तस्किन अहमद यांनी प्रत्येकी ४-४ गडी बाद संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
-
Bangladesh win 🙌
— ICC (@ICC) July 11, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Zimbabwe are bowled out for 256, with the visitors sealing a 220-run victory!
📸 @ZimCricketv #ZIMvBAN pic.twitter.com/Ylv6V4EU41
">Bangladesh win 🙌
— ICC (@ICC) July 11, 2021
Zimbabwe are bowled out for 256, with the visitors sealing a 220-run victory!
📸 @ZimCricketv #ZIMvBAN pic.twitter.com/Ylv6V4EU41Bangladesh win 🙌
— ICC (@ICC) July 11, 2021
Zimbabwe are bowled out for 256, with the visitors sealing a 220-run victory!
📸 @ZimCricketv #ZIMvBAN pic.twitter.com/Ylv6V4EU41
बांगलादेशने झिम्बाब्वे समोर विजयासाठी ४७७ धावांचे अवजड लक्ष्य ठेवले होते. कर्णधार ब्रेंडन टेलरने सर्वाधिक ९२ धावांची खेळी केली. तर डोनाल्ड तिरिपानो याने ५२ धावांचे योगदान दिले. आज सकाळी झिम्बाब्वेने ३ बाद १४० वरून खेळण्यास सुरूवात केली. परंतु त्यांची मधली फळी लवकर बाद झाल्याने त्यांच्यावर पराभवाची नामुष्की ओढावली.
झिम्बाब्वेच्या तळातील फलंदाजांना कडवा प्रतिकार केला. परंतु ते संघाचा पराभव टाळू शकले नाहीत. दहाव्या नंबरवर फलंदाजीसाठी आलेल्या ब्लेसिंग मुजारबानी ३० धावांवर नाबाद राहिला. बांगलादेशच्या मेहदी हसन याने ६६ धावांत ४ तर तस्किन अहमद याने ८२ धावांत ४ गडी बाद केले.
बांगलादेशने प्रथम फलंदाजी केली. तेव्हा महमुदुल्लाहने नाबाद १५० धावांची खेळी केली. तर कर्णधार मोमिनुल हक (७०), लिट्टन दास (९५) आणि तस्किन (७५) यांच्या योगदानाच्या जोरावर बांगलादेशने पहिल्या डावात ४६८ धावांचा डोंगर उभारला होता. त्यानंतर झिम्बाब्वेचा संघ २७६ धावांवर आलआउट झाला. तेव्हा बांगलादेशने २८४ धावा करत झिम्बाब्वेसमोर विजयासाठी ४७७ धावांचे आव्हान ठेवले होते.
हेही वाचा - IND vs SL: महेला जयवर्धने आजही 'या' विभागात 'किंग', सचिन तेंडुलकर थोडसे मागे तर विराट कोहली 'या' स्थानावर
हेही वाचा - Ind vs SL : श्रीलंकन खेळाडू-कोचिंग स्टाफचे कोरोना रिपोर्ट आले समोर, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स