ETV Bharat / sports

Spinner Yuzvendra Chahal : आयपीएल 2013 मध्ये चहलसोबत घडला होता भयानक प्रसंग; या कारणामुळे चहल लटकला होता बाल्कनीत - क्रिकेटच्या बातम्या

युझवेंद्र चहलने आयपीएल 2013 दरम्यान त्याच्यासोबत घडलेल्या एका भयानक घटनेचा खुलासा केला आहे. तेव्हा तो मुंबई इंडियन्ससोबत होता आणि बंगळुरूमध्ये झालेल्या सामन्यादरम्यान एका परदेशी खेळाडूने त्याला हॉटेलच्या बाल्कनीतून लटकवलेले. स्वतः चहलने राजस्थान रॉयल्सच्या यूट्यूब व्हिडिओमध्ये ( Yuzvendra Chahal Video ) याचा खुलासा केला आहे.

Yuzvendra Chahal
Yuzvendra Chahal
author img

By

Published : Apr 8, 2022, 7:16 PM IST

मुंबई: सध्या आयपीएलच्या पंधराव्या हंगामाची धामधूम सुरु आहे. यंदा फिरकीपटू युझवेंद्र चहलने हा राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व करत आहे. त्याने आपल्या आयपीएलच्या सुरुवातीचा काळ आठवताना एका भयानक किस्स्याचा ( Yuzvendra Chahal Startling revelation ) खुलासा केला आहे. फिरकीपटू युजवेंद्र चहलने आयपीएल 2013 दरम्यान घडलेल्या एका घटनेचा खुलासा करताना सांगितले की, एकदा एका मद्यधुंद क्रिकेटपटूने त्याला हॉटेलच्या 15व्या मजल्यावरच्या बाल्कनीतून खाली लटकवले होते. ज्यामुळे तो घाबरून बेशुद्ध पडला होता.

चहल त्यावेळी मुंबई इंडियन्स संघासोबत होता. यानंतर तो 2014 ते 2021 या काळात विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore ) संघात उपस्थित होता. त्याने आरसीबीसोबत बराच काळ घालवला, जो आयपीएल 2021 नंतर संपला आणि चहल आता राजस्थान रॉयल्सशी जोडला गेला आहे. मात्र चहलने खेळाडूचे नाव उघड केले नाही. परंतु चहलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये त्याच्या चाहत्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) खेळाडूवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ( Rajasthan Royals franchise Shares Video ), युझवेंद्र राजस्थान रॉयल्सचा संघ सहकारी रविचंद्रन अश्विनशी बोलत असताना, चहल म्हणाला की त्यावेळी तो किती घाबरला होता हे त्याने पहिल्यांदाच उघड केले आहे. अधिक माहिती देताना चहलने सांगितले की, ही घटना मी याआधी कोणालाही सांगितली नाही. पण आजपासून सर्वांना याची माहिती होईल.

युझवेंद्र चहल पुढे सांगताना म्हणाला की, ही गोष्ट 2013 सालची आहे. जेव्हा मी मुंबई इंडियन्ससोबत ( Representation of Mumbai Indians ) होतो. आमचा एक सामना बंगळुरूला होणार होता. यानंतर सर्व खेळाडू एकत्र आले आणि पार्टीचे आयोजन करण्यात आले. असे अनेक खेळाडू होते जे खूप मद्यपान करत होते. मी त्याचे नाव उघड करणार नाही. तो खेळाडूही नशेत होता आणि सतत माझ्याकडे पाहत होता. त्याने बराच वेळ माझ्याकडे पाहिले आणि त्यानंतर मला त्याच्याकडे बोलावले आणि मला बाहेर काढले आणि हॉटेलच्या बाल्कनीतून लटकवले, तेव्हा आम्ही हॉटेलच्या 15 व्या मजल्यावर होतो. त्यांनी मला धरले होते आणि जर मी थोडी ढिलाई दिली असती, तर मी खाली पडू शकलो असतो.

त्याने पुढे सांगितले की, त्यानंतर बरेच लोक तेथे आले आणि मला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि इतर खेळाडूंनी माझा हात धरून मला आत घेतले.आणि मी बेशुद्ध पडलो. ही घटना उघडकीस आल्यानंतर चहलच्या चाहत्यांनी त्याला त्या खेळाडूचे नाव विचारले, जे चहलने नाव सांगण्यास नकार दिला.

बीसीसीआयला ट्विट करत एका चाहत्याने लिहिले की, चहलसोबत घडलेल्या घटनेची चौकशी करण्यात यावी आणि त्या खेळाडूवर कारवाई करण्यात यावी. कारण खेळाडू दारूच्या नशेत होता आणि तिथे काहीही घडू शकत होते. चहलने आतापर्यंत राजस्थान रॉयल्सकडून तीन सामन्यांत सात विकेट घेतल्या आहेत.

हेही वाचा - Ban on flags with sticks : लाठीसह झेंडे घेऊन आलेल्या चाहत्यांना पोलीस आणि बीसीसीआय रोकणार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.