वेलिंग्टन: आयसीसी महिला विश्वचषक ( ICC Women World Cup 2022 ) स्पर्धेतील 23 वा सामना ( 23rd match of Women's World Cup ) वेलिंग्टन येते खेळला जाणार होता. हा सामना वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात खेळला जाणारा सामना पावसाचा व्यत्यय आल्याने रद्द करण्यात आला आहे. पावसामुळे सामना रद्द झाल्याने दोन्ही संघांना 1-1 गुण देण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही संघ आपापल्या ठिकाणी सुरक्षित आहेत. यामुळे दक्षिण आफ्रिकेचे सहा सामन्यात नऊ गुण झाले आहेत. त्यामुळे हा संघ ऑस्ट्रेलियानंतर सेमीफायनलमध्ये पोहचणारा ( South Africa reach the semi-finals ) दुसरा संघ ठरला आहे. त्याचबरोबर वेस्ट इंडिजचे लीग स्टेजचे सामने संपले असून ते सात सामन्यांतून सात गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहेत.
-
The South Africa-West Indies game has been abandoned due to bad weather with both teams earning one point.
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) March 24, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
And with that South Africa have qualified for the #CWC22 semi-final 👏 pic.twitter.com/5W6YlIePk8
">The South Africa-West Indies game has been abandoned due to bad weather with both teams earning one point.
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) March 24, 2022
And with that South Africa have qualified for the #CWC22 semi-final 👏 pic.twitter.com/5W6YlIePk8The South Africa-West Indies game has been abandoned due to bad weather with both teams earning one point.
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) March 24, 2022
And with that South Africa have qualified for the #CWC22 semi-final 👏 pic.twitter.com/5W6YlIePk8
वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका ( South Africa v West Indies ) सामन्यात वेस्ट इंडिज संघाने नाणेफेक जिंकूण प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचबरोबर प्रथम फलंदाजी करण्यासाठी दक्षिण आफ्रिका संघाला आमंत्रित केले होते. त्यानुसार या सामन्यात फक्त 10.5 षटके खेळली जाऊ शकली. ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने 4 बाद 61 धावा केल्या होत्या. त्यानंतर पावसामुळे खेळ थांबवावा लागला. त्यानंतर ही पुढे पाऊस सुरुच राहिल्याने पुढील खेळ होऊ शकला नाही.
-
South Africa become the second team to book their place in the #CWC22 semi-final 🙌 pic.twitter.com/mUtVrSTjpf
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) March 24, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">South Africa become the second team to book their place in the #CWC22 semi-final 🙌 pic.twitter.com/mUtVrSTjpf
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) March 24, 2022South Africa become the second team to book their place in the #CWC22 semi-final 🙌 pic.twitter.com/mUtVrSTjpf
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) March 24, 2022
प्रथम गोलंदाजी करण्याचा वेस्ट इंडिजचा निर्णय योग्य ठरला आणि त्यांनी दक्षिण आफ्रिकेची अवस्था 5.3 षटकांत 4 बाद 22 धावसंख्या अशी केली. चिनेली हेन्रीने 19 धावांत तीन, तर शमिलिया कॉनेलने 18 धावांत एक बळी घेतला. यानंतर मात्र मिग्नॉन डू प्रीझने ( Mignon do Prez ) (31 चेंडूत नाबाद 38 धावा) आक्रमक फलंदाजीला सुरुवात केली होती. जेव्हा पाऊस आला, तेव्हा त्याने मारिजन कॅपसह (नाबाद पाच) पाचव्या विकेटसाठी 39 धावा जोडल्या.
-
Four early wickets, a few dropped catches and an all-important point for South Africa in Wellington.
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) March 24, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Details 👇#CWC22https://t.co/xjziuNOUMW
">Four early wickets, a few dropped catches and an all-important point for South Africa in Wellington.
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) March 24, 2022
Details 👇#CWC22https://t.co/xjziuNOUMWFour early wickets, a few dropped catches and an all-important point for South Africa in Wellington.
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) March 24, 2022
Details 👇#CWC22https://t.co/xjziuNOUMW
या निकालाचा अर्थ असा आहे की उपांत्य फेरी गाठण्यासाठी भारताला रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल. या सामन्याचा निकाल लागला नाही, तर त्याचा फायदा भारताला होईल. कारण भारताचा रनरेट वेस्ट इंडिजपेक्षा चांगला ( India run rate better than WI ) आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजचा संघ दक्षिण आफ्रिकेच्या विजयासाठी प्रार्थना करेल. भारताचे सध्या सहा सामन्यातील तीन विजयांसह सहा गुण आहेत आणि ते पाचव्या स्थानावर आहे. इंग्लंडचेही तेवढेच गुण आहेत, पण चांगल्या धावगतीच्या आधारावर ते भारतापेक्षा पुढे आहेत.