ETV Bharat / sports

क्युरेटरने सांगितलं WTC Final साठी कशी असणार खेळपट्टी - ind vs nz wtc final 2021

अंतिम सामन्याच्या काळात हवामानाचा अंदाज चांगला आहे. या दिवसांमध्ये चांगला सूर्यप्रकाश असेल, त्यामुळे वेग आणि उसळी असणारी खेळपट्टी बनवण्यात आम्ही यशस्वी होऊ, असे साऊथम्पटनच्या मैदानाचे पिच क्युरेटर सिमोन ली यांनी सांगितलं.

wtc-final-india-vs-new-zealand-how-will-be-southampton-pitch-explains-curator
क्युरेटरने सांगितलं WTC Final साठी कशी असणार खेळपट्टी
author img

By

Published : Jun 14, 2021, 3:44 PM IST

साऊथम्पटन - जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात १८ ते २२ जूनदरम्यान रंगणार आहे. हा सामना इंग्लंडच्या साऊथम्पटनमध्ये होणार आहे. दरम्यान, इंग्लंडमधील खेळपट्ट्या या वेगवान गोलंदाजांना अनुकूल मानल्या जातात. पण अंतिम सामन्यासाठी तयार करण्यात येणारी खेळपट्टी कशी असेल, या बद्दलची माहिती समोर आली आहे.

साऊथम्पटनच्या मैदानाचे पिच क्युरेटर सिमोन ली यांनी खेळपट्टीबाबत एका क्रीडा संकेसस्थळाशी बातचित केली. यावेळी ते म्हणाले, खेळपट्टीवर उसळी आणि वेग असेल, कारण माझी स्वत:ची तशी इच्छा असते. पण इंग्लंडमध्ये अशी खेळपट्टी तयार करणे आव्हानात्मक असते. याचं कारण येथील वातावरण असून ते बहुतेक वेळा खराब असतं. पण अंतिम सामन्याच्या काळात हवामानाचा अंदाज चांगला आहे. या दिवसांमध्ये चांगला सूर्यप्रकाश असेल, त्यामुळे वेग आणि उसळी असणारी खेळपट्टी बनवण्यात आम्ही यशस्वी होऊ.

दरम्यान, सिमोन ली यांनी सांगितल्याप्रमाणे जर उसळी आणि वेगवान खेळपट्टी तयार करण्यात आली तर भारतीय संघाला चांगलेच कसब पणाला लावावे लागणार आहे. कारण, न्यूझीलंडने इंग्लंडचा अशाच खेळपट्टीवर पराभव केला आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा आत्मविश्वास थोडा जास्त असेल. आयसीसीकडून पहिल्यांदाचं या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे सगळ्या क्रिकेट रसिकांचे लक्ष या अंतिम सामन्याकडे लागले आहे.

हेही वाचा - आयर्नमॅन हार्दिक पाटील यांच्या घरावर पेट्रोल बाटल्यांच्या हल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद

हेही वाचा - 'या' तारखेपासून सुरू होणार आयपीएलचे उर्वरित सामने, अंतिम सामना १५ ऑक्टोबरला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.