ETV Bharat / sports

'WTC च्या विजयाने २०१९ विश्वकरंडक फायनलमधील पराभवाचं नुकसान भरून निघालं' - ross taylor

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या विजयाने २०१९ साली इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील पराभवाचे नुकसान भरून निघालं, असल्याची प्रतिक्रिया न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज रॉस टेलरने दिली.

wtc-final-2021-new-zealand-win-ind-vs-nz-ross-taylor-said-defeating-india-make-up-for-2019-world-cup-final
'WTC च्या विजयाने २०१९ विश्वकरंडक फायनलमधील पराभवाची झाली नुकसान भरपाई'
author img

By

Published : Jun 24, 2021, 5:36 PM IST

मुंबई - भारताचा आठ गडी राखून पराभव करत न्यूझीलंडने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात न्यूझीलंडच्या खेळाडूंनी सांघिक खेळाचे प्रदर्शन केले. न्यूझीलंडचे खेळाडू तिन्ही आघाडीवर सरस ठरले. या विजयानंतर न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज रॉस टेलर भावूक झाला. त्याने सामना संपल्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या.

रॉस टेलर म्हणाला, या विजयाने २०१९ साली इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील पराभवाचे नुकसान भरून निघालं. दरम्यान, २०१९ साली न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. हा सामना सुपर ओव्हरमध्ये देखील टाय झाला. तेव्हा सुपर ओव्हरच्या चौकाराच्या नियमानुसार इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आले. तोंडाशी आलेला विजयाची चव न्यूझीलंड संघाला नियमामुळे चाखता आली नाही. ते शल्य टेलरच्या मनात होते.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील, न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात संघ अडचणीत असताना रॉस टेलरने अविस्मरणीय खेळी केली. त्याने दुसऱ्या डावात १०० चेंडूचा सामना करताना नाबाद ४७ धावांची खेळी साकारली. विशेष म्हणजे टेलरनेच विजयी फटका मारला. त्याला कर्णधार केन विल्यमसनने अर्धशतक झळकावत चांगली साथ दिली. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी नाबाद ९६ धावांची भागिदारी करत न्यूझीलंडला विजय मिळवून दिला.

हेही वाचा - WTC Final : न्यूझीलंडकडून पराभवानंतर विराट निराश, दिले कसोटी संघात बदलाचे संकेत

हेही वाचा - हा विजय आयुष्यभर लक्षात ठेवेन, WTC चे विजेतेपद पटकावल्यानंतर न्यूझीलंडचे दिग्गज भावूक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.