मुंबई - भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याला सुरूवात होण्यास अवघ्या तीन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. या सामन्याबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. क्रिकेटप्रेमींच्या मनात कोणता संघ हा 'महामुकाबला' जिंकणार? हाच प्रश्न घोंघावत आहे. यादरम्यान आम्ही तुम्हाला उभय संघ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये किती वेळा एकमेकांसमोर उभे टाकले आहेत. यात कोणता संघ वरचढ ठरला आहे. याची माहिती देणार आहोत.
आयसीसी स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंड हे संघ १९७५ साली विश्व करंडक स्पर्धेत एकमेकांसमोर पहिल्यांदा समोर आले. तेव्हापासून आजपर्यंत उभय संघातील सामने रोमांचक झाले आहेत. भारत आणि न्यूझीलंड आयसीसी स्पर्धेत आतापर्यंत ११ वेळा समोरासमोर आले. यात न्यूझीलंडने ८ वेळा तर भारतीय संघाने ३ सामने जिंकले. आकडे पहिल्यास भारतीय संघ न्यूझीलंडपेक्षा खूप मागे आहे.
-
New Zealand continue to dominate India in ICC tournaments (8-3) just like Sri Lanka. (Sri Lanka 7-5 India) #Cricket
— Daniel Alexander (@daniel86cricket) July 10, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
ODI World Cup
ODIs - 8
NZ - 5
IND - 3
Champions Trophy
ODI - 1
NZ - 1
T20I World Cup
T20Is - 2
NZ - 2
">New Zealand continue to dominate India in ICC tournaments (8-3) just like Sri Lanka. (Sri Lanka 7-5 India) #Cricket
— Daniel Alexander (@daniel86cricket) July 10, 2019
ODI World Cup
ODIs - 8
NZ - 5
IND - 3
Champions Trophy
ODI - 1
NZ - 1
T20I World Cup
T20Is - 2
NZ - 2New Zealand continue to dominate India in ICC tournaments (8-3) just like Sri Lanka. (Sri Lanka 7-5 India) #Cricket
— Daniel Alexander (@daniel86cricket) July 10, 2019
ODI World Cup
ODIs - 8
NZ - 5
IND - 3
Champions Trophy
ODI - 1
NZ - 1
T20I World Cup
T20Is - 2
NZ - 2
भारतीय संघाने २००३ च्या विश्वकरंडक स्पर्धेत न्यूझीलंडचा पराभव केला होता. त्यानंतर उभय संघात झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने बाजी मारली आहे. भारतीय संघ मागील १८ वर्षांपासून आयसीसीच्या स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्ध जिंकू शकलेला नाही. पण १८ जूनपासून सुरू होत असलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ पराभवाचा दुष्काळ संपवणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
न्यूझीलंडचा आत्मविश्वास दुणावला -
न्यूझीलंडच्या संघाने अंतिम सामन्याआधी इंग्लंडविरोधात दोन सामन्याची कसोटी मालिका खेळली. यात त्यांनी १-० असा विजय मिळवला. या विजयासह ते जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहोचले आणि भारतीय संघ दुसऱ्या स्थानी घसरला. विशेष म्हणजे, तब्बल २२ वर्षानंतर न्यूझीलंडच्या संघाने इंग्लंडमध्ये मालिका जिंकली आहे. यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.
हेही वाचा - WTC FINAL : ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनचे भाकित, 'हा' संघ सहज जिंकणार फायनल
हेही वाचा - WTC Final : भारताविरुद्धच्या 'महामुकाबल्या'साठी न्यूझीलंड साउथम्पटनमध्ये दाखल