ETV Bharat / sports

World Cup २०२३ IND vs AUS : कोहलीला मिळालेलं 'जीवदान' भारतासाठी ठरलं 'वरदान'; पहिल्याच सामन्यात मोडले 'हे' विक्रम

World Cup 2023 IND vs AUS : २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची टॉप ऑर्डर पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोलमडली. अशा परिस्थितीत विराट कोहलीनं पुन्हा टीम इंडियासाठी शानदार फलंदाजी करत आघाडी घेतली आणि वनडे कारकिर्दीतील 66 वं अर्धशतक झळकावलं. या सामन्यात विराटनं ऑस्ट्रेलियाच्या धोकादायक गोलंदाजांचा धैर्यानं सामना करत राहूलच्या साथीनं टीम इंडियाला शानदार विजय मिळवून दिला.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 8, 2023, 10:40 PM IST

World Cup 2023 IND vs AUS
World Cup 2023 IND vs AUS

चेन्नई : World Cup 2023 IND vs AUS : भारतीय क्रिकेट संघानं आयसीसी विश्वचषक 2023 चा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर कांगारुंवर 6 गडी राखत विजय संपादन केला. या सामन्यात इशान किशन शून्य धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतल्यावर विराट कोहली फलंदाजीला आला. यानंतर विराट दुसऱ्या टोकाला उभा राहून प्रथम कर्णधार रोहित शर्मा (0) आणि नंतर श्रेयस अय्यर (0) पॅव्हेलियनमध्ये परतताना पाहत होता. टीम इंडिया कठीण परिस्थितीत असताना विराट कोहलीनं राहूलच्या साथीनं सावध फलंदाजी करत धावसंख्या पुढे नेली आणि शानदार फटकेही मारले.

विराट कोहलीनं झळकावलं 66 व अर्धशतक : विराटनं कठीण काळात शानदार फलंदाजी करत 75 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने 50 धावा पूर्ण केल्या. या काळात त्याचा स्ट्राइक रेट 64.10 होता. यानंतर आक्रमक फटका मारण्याच्या नादात हेजलवूडची शिकार झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघ 49.3 षटकांत 199 धावांत गारद झाला. ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नरनं 41 आणि स्टीव्ह स्मिथनं 46 धावा केल्या. तर, भारतासाठी डावखूरा फिरकीपटू रवींद्र जडेजानं 2.8 च्या उत्कृष्ट इकॉनॉमीसह 28 धावांत 3 बळी घेतले. 200 धावांचा पाठलाग करताना भारतानं 41.2 षटकांत 201 धावा करत विजय मिलवला.

विराटला सुरुवातीला मिळालं जिवदान : विराटनं सुरुवातीला ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना सावधपणे खेळवलं आणि नंतर हळूहळू हात उघडले. या काळात विराट कोहलीलाही जीवनदान मिळाले. तो जोश हेझलवूडला पूर्ण शॉट मारायला गेला तेव्हा चेंडू हवेत उभा राहिला. यादरम्यान यष्टीरक्षक अ‍ॅलेक्स कॅरी आणि मिचेल मार्श हे दोघंही झेल पकडण्यासाठी धावले पण चेंडू मार्शच्या हातातून सुटला. यासह विराट कोहलीलाही जीवदान मिळालं. यानंतर विराटनं मागं वळून पाहिलं नाही आणि एकदिवसीय कारकिर्दीतील 66 वं अर्धशतक झळकावलं.

कोहलीनं कोणते विक्रम नोंदवले :

  • विराट कोहली आणि के.एल. राहुल यांची दीडशतकी भागिदारी झाली. विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरोधातील ही आतापर्यंतची सर्वोत्तम भागिदारी
  • एकदिवसीय फॉर्मेटमध्ये सर्वाधिक वेळा 50 पेक्षा जास्त धावा (नॉन ओपनर) विराट कोहलीच्या नावावर जमा झाल्या आहेत, 270 डावात विराट कोहलीचा 114 वा 50 प्लस स्कोर.
  • विराट कोहलीनं तिसऱ्या क्रमांकावर 11 हजार धावांचा टप्पा पार केला. तिसऱ्या क्रमांकावर 11 हजार धावा करणारा विराट कोहली पहिलाच खेळाडू ठरला.
  • विराट कोहली विश्वचषकात सर्वाधिक धावा (नॉन ओपनर) करणारा फलंदाज झाला.
  • आयसीसीच्या व्हॉइट बॉल स्पर्धेत भारातकडून सर्वाधिक धावा करणारा विराट कोहली पहिला खेळाडू ठरला. विराट कोहलीनं 24 डावात 2720 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्यानं सचिनचा विक्रम मोडला. सचिन तेंडुलकरनं 58 डावात 2719 धावा केल्या आहेत, तर तिसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा आहे. त्यानं 64 डावात 2422 धावा केल्या आहेत.
  • वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणारा विराट कोहली दुसरा भारतीय खेळाडू. विराट कोहलीच्या नावावर आता जवळपास 1100 धावांची नोंद. सचिन तेंडुलकर 2278 धावांसह पहिल्या स्थानावर कायम आहे तर सौरव गांगुली 1006 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
  • विराट कोहलीनं विश्वचषकात सर्वाधिक झेल घेणारा भारतीय खेळाडू म्हणून मान मिळवला. विराट कोहलीनं विश्वचषकाच्या 27 डावामध्ये 15 झेल घेतले आहेत.

हेही वाचा :

  1. ICC ODI World Cup 2023 India Vs Australia : कोहली-राहुलनं लाज राखली, भारताचा ऑस्ट्रेलियावर ६ गडी राखून विजय
  2. Cricket World Cup २०२३ : वर्ल्डकपमध्ये डेव्हिड वॉर्नरचा विश्वविक्रम, सचिन, डिव्हिलियर्सला मागं टाकलं
  3. Cricket World Cup 2023 IND vs PAK : भारत-पाकिस्तान सामन्यासाठी 14 हजार तिकीटं जारी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.