ETV Bharat / sports

Cricket World Cup 2023 : सराव सामन्यासाठी टीम इंडिया गुवाहाटीमध्ये दाखल - Team India arrives in Guwahati

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा 2023 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे, तर अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या स्पर्धेपूर्वी सर्व संघ सराव सामने खेळणार आहेत. भारतीय संघाचा पहिला सराव सामना 30 सप्टेंबर रोजी इंग्लंड विरुद्ध खेळला जाणार आहे ज्यासाठी टीम इंडिया गुवाहाटीला पोहोचली आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 28, 2023, 10:52 PM IST

गुवाहाटी : ICC एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी काउंटडाउन सुरू झालं आहे. यात सहभागी होणारे सर्व संघ जोरदार तयारीला लागले आहेत. ICC एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक यावेळी कोण जिंकणार याकडं सर्व क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागलंय. गुवाहाटीत संघ यायला सुरुवात झाली आहे. आधीच काही क्रिकेट संघ सराव सामन्यांसाठी पोहोचले आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ गुरुवारी सराव सामन्यासाठी आज दाखल झाला असून तेथे गतविजेत्या इंग्लंडचा सामना 30 सप्टेंबर रोजी होणार आहे. यापूर्वी श्रीलंका, बांगलादेशाचा संघ बुधवारी शहरात दाखल झाले होते.

ऑस्ट्रेलियाचा 2-1नं पराभव : 12 वर्षांनंतर मायदेशी प्रतिष्ठित ट्रॉफी जिंकण्याचा भारतीय संघ जोरदार तयारी करीत आहे. यासाठी भारतीय संघ अंतिम चाचणी घेत आहे. एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या संघानं नुकत्याच संपलेल्या वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाचा 2-1 असा पराभव केला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाचं बोर्झार येथील एलजीबीआय विमानतळावर आगमन झाल्यानंतर आसाम क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आणि आसाम सरकारच्या अधिकाऱ्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. त्यानंतर संघ रॅडिसन ब्लूला गेला.

स्पर्धेपूर्वी चार सराव सामने होणार : गुरुवारी बांगलादेश संघानं बरसापारा येथे दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत सराव केला. शुक्रवारी अमिनगाव स्टेडियमवर भारत, इंग्लंड संघ सराव करणार आहेत. वेळापत्रकाचा भाग म्हणून, बहुप्रतिक्षित मुख्य स्पर्धेपूर्वी चार सराव सामने गुवाहाटी येथील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळवले जातील. बांगलादेश, श्रीलंका यांच्यात शुक्रवारी दुपारी बारसापारा येथे ICC पुरुष विश्वचषक स्पर्धेतील पहिला सामना खेळवला जाणार आहे.

  • भारत, इंग्लंड सामना 30 सप्टेंबरला : भारत, इंग्लंड यांच्यातील सराव सामना 30 सप्टेंबर रोजी होणार आहे. इंग्लंड, बांगलादेश यांच्यातील तयारीचा सामना 2 ऑक्टोबरला होणार आहे. अफगाणिस्तान, श्रीलंका यांच्यातील तयारीचा सामना 3 ऑक्टोबरला होणार आहे.

हेही वाचा -

  1. World Cup 2023 : अक्षर पटेल विश्वचषक 2023 मधून बाहेर, 'या' अष्टपैलू खेळाडूला संघात स्थान
  2. Ind Vs Aus Match : भारताचा ऑस्ट्रेलियाकडून 66 धावांनी पराभव, रोहितसह कोहलीची खेळी ठरली निष्फळ
  3. Asian Games 2023 : सिफ्ट समरानं सुवर्णपदकं जिंकलं, आशी चौकसेला रौप्यपदक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.