नवी दिल्ली महिला इंडियन प्रीमियर लीग Womens Indian Premier League मार्च 2023 मध्ये एका महिन्याच्या विंडोमध्ये सुरू होणार आहे. त्यात पाच संघ खेळण्याची शक्यता आहे, याला शुक्रवारी बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दुजोरा दिला. या मुद्द्यावर बीसीसीआयच्या उच्च पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली आणि दक्षिण आफ्रिकेतील महिला T20 विश्वचषक स्पर्धेनंतर मार्चची विंडो योग्य मानली गेली.
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, "होय, WIPL मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल आणि आम्ही पहिल्या वर्षासाठी चार आठवड्यांची विंडो सेट केली आहे." टी20 विश्वचषक 9 ते 20 फेब्रुवारी दरम्यान दक्षिण आफ्रिकेत होणार आहे. त्यानंतर लवकरच WIPL आयोजित करण्याची आमची योजना आहे.
"सध्या, आम्ही पाच संघांसह स्पर्धा आयोजित करू परंतु संभाव्य गुंतवणूकदारांमध्ये खूप रस असल्याने ती सहा संघांची असू शकते," ते म्हणाले. यापुढे संघांच्या लिलावाची प्रक्रिया जाहीर केली जाईल. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली BCCI President Sourav Ganguly आणि सचिव जय शाह यांनी यापूर्वी पीटीआयला दिलेल्या स्वतंत्र मुलाखतीत डब्ल्यूआयपीएल २०२३ WIPL 2023 मध्ये सुरू होणार असल्याची पुष्टी केली होती.
मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्ज या सर्वांनी महिला संघ खरेदी करण्यात रस दाखवला. यूटीव्हीचे सीईओ रॉनी स्क्रूवाला यांनीही ट्विट केले की त्यांना WIPL फ्रेंचायझी खरेदी करण्यात रस आहे.