लंडन - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली, इंग्लंडविरुद्ध लॉर्डस् स्टेडियममध्ये सुरू असलेल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी पंचांच्या निर्णयावर नाराज दिसला. घडले असे की, चौथ्या दिवसाच्या अंतिम सत्रात कमी प्रकाशामुळे फलंदाजाला चेंडू खेळण्यासाठी अडचण येत होती. तरी देखील पंचांनी खेळ सुरू ठेवला. तेव्हा विराट पॅव्हेलियनमधून आपल्या फलंदाजांना परत या असा इशारा करून सांगताना पाहायला मिळाला.
विराट कोहलीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात तो लॉर्डस् स्टेडियमच्या बाल्कनीमध्ये आपल्या सहकाऱ्यांसोबत बसलेला पाहायला मिळत आहे. जेव्हा प्रकाशामुळे फलंदाजाला चेंडू खेळण्यासाठी अडचण येत होती. तेव्हा देखील पंचांनी सामना सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. यावर विराट कोहली भडकला. त्याने कमी प्रकाश असल्याचे हाताद्वारे इशारा करत सांगितलं. यानंतर तो आपल्या फलंदाजांना परत येण्याच्या सुचना देखील इशाऱ्याद्वारे देताना दिसला.
-
Light uh ungappana poduvaan moment😂
— Vijay Rules Only™😎 (@vijayrulesonly) August 15, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
King and Rohit❤️😻#Kohli #Pant #Rohitpic.twitter.com/WYbMGQzXsE
">Light uh ungappana poduvaan moment😂
— Vijay Rules Only™😎 (@vijayrulesonly) August 15, 2021
King and Rohit❤️😻#Kohli #Pant #Rohitpic.twitter.com/WYbMGQzXsELight uh ungappana poduvaan moment😂
— Vijay Rules Only™😎 (@vijayrulesonly) August 15, 2021
King and Rohit❤️😻#Kohli #Pant #Rohitpic.twitter.com/WYbMGQzXsE
विराट कोहलीने यावेळी भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माला मागे वळून चर्चा केली. यानंतर रोहित शर्माने देखील पंचांच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केला. अशात इंग्लंडचा कर्णधार जो रुटने नवा चेंडू घेण्याचा निर्णय घेतला. तेव्हा पंचांनी चौथ्या दिवसाचा खेळ समाप्त करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना निर्णायक अवस्थेत पोहोचला आहे. भारताने चौथ्या दिवसाअखेर 6 बाद 181 धावा केल्या आहेत. भारताकडे 154 धावांची आघाडी झाली आहे. अंधूक सूर्यप्रकाशामुळे चौथ्या दिवशी खेळ लवकर थांबवण्यात आला तेव्हा ऋषभ पंत 14 आणि इशांत शर्मा 4 धावांवर खेळत होता.
हेही वाचा - IND vs ENG : विराट कोहलीच्या बॅटिंग अप्रोचवर सुनील गावसकरांनी उठवला सवाल
हेही वाचा - Ind Vs Eng 2nd test : भारत-इंग्लंड कसोटी निर्णायक अवस्थेत