ETV Bharat / sports

WTC Final : न्यूझीलंडकडून पराभवानंतर विराट निराश, दिले कसोटी संघात बदलाचे संकेत

संघाला आणखी मजबूत करण्यासाठी काय करावे लागेल याचा विचार आम्ही करणार आहोत. आम्ही वर्षभर वाट न पाहता लवकरच योग्य निर्णय घेऊन मर्यादित षटकांतील भारतीय संघाप्रमाणे कसोटी संघ करणार आहोत, असे विराटने सांगितलं.

Virat Kohli hints at changes in India Test side after WTC final loss

author img

By

Published : Jun 24, 2021, 3:24 PM IST

मुंबई - भारतीय संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडकडून ८ गडी राखून पराभव स्विकारावा लागला. या पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने काही महत्वाची वक्तव्य केली आहेत. त्याची वक्तव्ये पाहता भारतीय कसोटी संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

भारतीय फलंदाजाच्या सुमार कामगिरीमुळे भारताचा अंतिम सामन्यात पराभव झाला. त्यामुळे विराटने फलंदाजावर या पराभवाचे खापर फोडलं आहे. त्याने कोणाचेही नाव न घेता फलंदाजाच्या कामगिरीबद्दल निराशा व्यक्त केली. विराट म्हणाला, 'संघाला आणखी मजबूत करण्यासाठी काय करावे लागेल याचा विचार आम्ही करणार आहोत. आम्ही वर्षभर वाट न पाहता लवकरच योग्य निर्णय घेऊन मर्यादित षटकांतील भारतीय संघाप्रमाणे कसोटी संघ करणार आहोत.'

आम्हाला एक नवीन सुरुवात करुन योग्य ती योजना आखावी लागणार आहे. तसेच संघासाठी काय फायदेशीर आहे ते जाणून घेऊन आम्ही निडरपणे कसे खेळू शकणार आहोत. याचाही विचार करावा लागणार आहे. त्यासाठी कोणत्या खेळाडूंना संघात आणावे लागले याचाही विचार होणार आहे. आधी मानसिक दृष्ट्या ताकदवर होऊन आम्हाला खेळ सुधारावा लागेल, असेही विराट म्हणाला.

दरम्यान, अंतिम सामन्यात भारताचा वरिष्ठ फलंदाज चेतेश्वर पुजाराला मोठी खेळी करण्यात अपयश आलं. त्याने पहिल्या डावात ५४ चेंडूत केवळ ८ धावा केल्या. निराशाजनक बाब म्हणजे, पहिली धाव घेण्यासाठी पुजाराने ३५ चेंडू खेळले. तर दुसऱ्या डावात त्याने ८० चेंडूमध्ये १५ धावांच केल्या.

भारताचा असा झाला पराभव -

अंतिम सामन्यात भारताचा पहिला डाव २१७ धावांवर आटोपला. त्यानंतर न्यूझीलंडने पहिल्या डावात २४९ धावा करत ३२ धावांची आघाडी घेतली. भारतीय संघ दुसऱ्या डावातही ढेपाळला आणि १७० धावांवर ऑलआऊट झाला. न्यूझीलंडला विजयासाठी १३९ धावांचे माफक लक्ष्य मिळाले. न्यूझीलंडने हे आव्हान २ गड्याच्या मोबदल्यात पूर्ण करत विजेतेपद पटकावले.

हेही वाचा - WTC Final : लढवय्या वॉटलिंग! बोटाला गंभीर दुखापत तरीही मैदान सोडलं नाही

हेही वाचा - Ind Vs NZ WTC Final : जागतिक कसोटी अजिंक्यपद न्यूझीलंडकडे, ८ गडी राखत केला भारताचा पराभव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.