मुंबई : यूपी वॉरियर्सविरुद्ध गुजरात जायंट्स संघाचे कर्णधारपद स्नेह राणाकडे आहे. शनिवारी मुंबईसोबत खेळल्या गेलेल्या सलामीच्या सामन्यात गुजरातची कर्णधार बेथ मुनीला दुखापत झाली होती. त्यामुळे आज गुजरातचे कर्णधारपद स्नेह राणाच्या हाती आहे. गुजरातने नाणेफेक जिंकून राणाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरातने आज प्लेइंग-11 मध्ये तीन बदल केले आहेत. यूपी वॉरियर्सने अखेरच्या षटकात 3 गडी राखून सामना जिंकला. यूपीसाठी सामन्याची नायिक ग्रेस हॅरिस होती, जिने 26 चेंडूत नाबाद 59 धावा खेळून आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
गुजरात जायंट्सची प्लेइंग-11 : सोफिया डंकली, सुषमा वर्मा (wk), सभिनेनी मेघना, दयालन हेमलता, स्नेह राणा (c), हरलीन देओल, तनुजा कंवर, किम गर्थ, ॲनाबेल सदरलँड, मानसी जोशी, ॲशले गार्डनर; यूपी वॉरियर्सची प्लेइंग-11 : अलिसा हॅली (c/wk), श्वेता सेहरावत, ताहलिया मॅकग्रा, दीप्ती शर्मा, ग्रेस हॅरिस, सिमरन शेख, किरण नवगिरे, देविका वैद्य, सोफी एक्लेस्टोन, अंजली सरवानी, राजेश्वरी गायकवाड.
स्नेहा राणाला संघाची कर्णधार बनवण्याची शक्यता : बेथ मुनीबद्दल अशी चर्चा आहे की, तिला डब्ल्यूपीएलच्या संपूर्ण सीझनमध्ये बाहेर राहावे लागेल. ती एकदम फिट होईपर्यंत बेथ मुनी परत येऊ शकणार नाही. या लीगच्या पहिल्या सामन्यात मुंबईविरुद्ध गुजरात जायंट्सची कामगिरी अत्यंत खराब होती. मुंबईने गुजरात जायंट्सला 205 धावांचे लक्ष्य दिले होते. आपले टार्गेट पूर्ण करण्यासाठी आलेली गुजरात जायंट्सची कर्णधार बेथ मुनीला 3 चेंडूनंतरच घरी परतावे लागले. याचे कारण असे की, मूनीच्या गुडघ्यात अचानक दुखू लागले, मूनीला खूप वेदना खूप वाढल्या तेव्हा ती दोन खेळाडूंच्या मदतीने मैदानाबाहेर गेली. आता मुनी एकदम फिट होईपर्यंत गुजरात जायंट्सची उपकर्णधार स्नेहा राणाला संघाची कर्णधार बनवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.