बैसेटेरे (सेंट किट्स): तीन वेळचे चॅम्पियन ऑस्ट्रेलियाने कोनारी स्पोर्ट्स क्लब मध्ये खेळल्या गेलेल्या आयसीसी अंडर-19 क्रिकेट विश्वकप स्पर्धेत स्कॉटलॅंडला सात विकेट्सने पराभूत करत (Australia beat Scotland by seven wickets) शानदार पुनरागमन केले आहे.
टीग वायलीच्या नाबाद 101 धावांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने तीन विकेट गमावून 240 धावा करुन सामना आपल्या नावावर केला. प्रथम फलंदाजी करायला उतरलेल्या स्कॉटलॅंड संघाने निर्धारित 50 षटकांत 8 विकेट्स गमावून 237 धावा केल्या. ज्यामध्ये चार्ली टियर आणि टॉमसने अर्धशतकीय खेळी केली (Charlie Tier and Tomas scored half-centuries). त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांकडून दबाज एडन काहिल आणि विलियम साल्जमान यांनी प्रत्यकी 2-2 विकेट घेतल्या.
तसेच आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रलिया टीमने 39.5 षटकांत 3 विकेट गमावून 240 धावा केल्या. सलामीची जोडी कैंपबेल केलावे (47) आणि टीग विलीनॉट (101), कूपर कोनोली (11), इसाक हिगिंस (5) आणि एडन काहिलने 72 धावांची खेळी केली.