हैदराबाद - इंग्लंडच्या बर्मिंगहम शहरात यंदा कॉमनवेल्थ गेम्स 2022 ही स्पर्धा ( Commonwealth Games 2022 ) पार पडणार आहे. 29 जुलैपासून या स्पर्धेल सुरु होईल. या स्पर्धेत महिला क्रिक्रेट संघही सहभागी होणार आहे. यासाठी भारतीय महिलांचा संघ जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये कर्णधार म्हणून हरमनप्रीत कौर ( Harmanpreet Kaur ) संघाची धुरा संभाळणार आहे. तर, स्मृती मंधाना उपकर्णधार असणार आहे.
-
🚨 JUST IN: India have named their squad for the 2022 Commonwealth Games! #B2022 https://t.co/ob8rSvhaMa
— ICC (@ICC) July 11, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">🚨 JUST IN: India have named their squad for the 2022 Commonwealth Games! #B2022 https://t.co/ob8rSvhaMa
— ICC (@ICC) July 11, 2022🚨 JUST IN: India have named their squad for the 2022 Commonwealth Games! #B2022 https://t.co/ob8rSvhaMa
— ICC (@ICC) July 11, 2022
आयसीसीसोबत बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. त्यात भारताने आपल्या 15 महिला सदस्य संघाची घोषणा केली आहे. या संघात हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मांधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, तानिया सपना भाटिया (यष्टीरक्षक), यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), एस. मेघना, राजेश्वरी गायकवाड, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, पूजा वस्त्राकर, मेघना सिंह, रेणूका ठाकूर, जेमिमा रॉड्रिग्ज, राधा यादव, हरलीन देवोल यांचा समावेश असेल.
हेही वाचा - Venkatesh Prasad Statement : कुंबळे, गांगुली आणि युवराज यांना संघातून वगळले गेले... तर कोहलीला का नाही?