नवी दिल्ली T20 World Cup 2024 : 2023 चा एकदिवसीय विश्वचषक संपून अवघे काही दिवस झाले आहेत. यानंतर आता 2024 मध्ये टी 20 विश्वचषकही होणार आहे. पुढील वर्षी जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या या स्पर्धेचं चित्र आता स्पष्ट झालंय. हा विश्वचषक नवीन फॉरमॅटसह खेळवण्यात येणार आहे. या विश्वचषक स्पर्धेत 20 संघ सहभागी होणार आहेत. टी20 विश्वचषक 2024 साठी पात्रता फेरीचे सामनेही पूर्ण झाले आहेत.
-
Presenting the 2⃣0⃣ teams that will battle for ICC Men's #T20WorldCup 2024 🏆
— ICC (@ICC) November 30, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
✍: https://t.co/9E00AzjcRN pic.twitter.com/1nu50LOLWQ
">Presenting the 2⃣0⃣ teams that will battle for ICC Men's #T20WorldCup 2024 🏆
— ICC (@ICC) November 30, 2023
✍: https://t.co/9E00AzjcRN pic.twitter.com/1nu50LOLWQPresenting the 2⃣0⃣ teams that will battle for ICC Men's #T20WorldCup 2024 🏆
— ICC (@ICC) November 30, 2023
✍: https://t.co/9E00AzjcRN pic.twitter.com/1nu50LOLWQ
कशा पद्धतीनं खेळवला जाणार विश्वचषक : क्वालिफायर सामन्यांमध्ये झिम्बाब्वेला पात्रता मिळवता आलेली नाही. झिम्बाब्वेला हा फार मोठा धक्का मानला जातोय. त्यांच्या गटातील नामिबिया आणि युगांडा यासाठी पात्र ठरले आहेत. विशेष म्हणजे इतिहासात प्रथमच युगांडा या मुख्य स्पर्धेसाठी पात्र झालाय. आता पात्रता फेरी पूर्ण झाली आहे. आता या विश्वचषकात 20 संघ सहभागी होणार आहेत. या विश्वचषकासाठी प्रत्येकी पाच संघांचे चार गट तयार केले जाणार आहेत. प्रत्येक संघ आपापल्या गटातील संघांविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळेल. त्यांच्या गटातील दोन संघ पुढील टप्प्यात उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. जे सुपर 8 म्हणून ओळखलं जाईल. तिथूनच संघ अंतिम फेरीसाठी लढतील.
-
The format for T20 World Cup 2024:
— Johns. (@CricCrazyJohns) November 30, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
🏏 20 Teams
⭐ 5 teams divided into 4 groups
👊 Top 2 teams from each group qualify into Super 8
🤝 Teams in Super 8 will be divided into 2 Groups
💪 2 Teams from each group of Super 8 will qualify into Semis
A cracking World Cup on the way. pic.twitter.com/Xpb2MRVr4X
">The format for T20 World Cup 2024:
— Johns. (@CricCrazyJohns) November 30, 2023
🏏 20 Teams
⭐ 5 teams divided into 4 groups
👊 Top 2 teams from each group qualify into Super 8
🤝 Teams in Super 8 will be divided into 2 Groups
💪 2 Teams from each group of Super 8 will qualify into Semis
A cracking World Cup on the way. pic.twitter.com/Xpb2MRVr4XThe format for T20 World Cup 2024:
— Johns. (@CricCrazyJohns) November 30, 2023
🏏 20 Teams
⭐ 5 teams divided into 4 groups
👊 Top 2 teams from each group qualify into Super 8
🤝 Teams in Super 8 will be divided into 2 Groups
💪 2 Teams from each group of Super 8 will qualify into Semis
A cracking World Cup on the way. pic.twitter.com/Xpb2MRVr4X
टी20 विश्वचषकाचा इतिहास काय : आयसीसी पुरुष टी 20 विश्वचषक पहिल्यांदा 2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आला होता. तर मागील आयसीसी टी 20 क्रिकेट विश्वचषक 2022 ऑस्ट्रेलियात 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर 2022 दरम्यान खेळवला गेला होता. टी 20 विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिज आणि इंग्लंड हे एकमेव संघ आहेत. जे आतापर्यंत दोनदा विश्वचषक विजेते ठरले आहेत.
सहभागी 20 संघ कोणते :
वेस्ट इंडिज आणि अमेरिका (आयोजक) यांच्यासह भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, अफगाणिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश, दक्षिण आफ्रिका, नेदरलॅंड्स, कॅनडा, नेपाळ, ओमान, पापूआ न्यू गिनी, आयर्लंड, स्कॉटलॅंड, नामिबिया आणि युगांडा हे 20 संघ आगामी विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
2007 ते 2022 पर्यंतच्या विजेत्यांची यादी :
- 2007 भारत
- 2009 पाकिस्तान
- 2010 इंग्लैंड
- 2012 वेस्टइंडीज
- 2014 श्रीलंका
- 2016 वेस्टइंडीज
- 2021 ऑस्ट्रेलिया
- 2022 इंग्लैंड
हेही वाचा :