पल्लेकल : भारतीय महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेनंतर एकदिवसीय मालिकेवरही कब्जा केला आहे. टी-20 मालिका 2-1ने जिंकल्यानंतर भारताने दुसरी वनडे 10 गडी राखून जिंकली ( India Women won by 10 wickets ). त्यामुळे भारतीय महिला संघाने मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.
-
𝗜𝗻𝗻𝗶𝗻𝗴𝘀 𝗕𝗿𝗲𝗮𝗸!
— BCCI Women (@BCCIWomen) July 4, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Renuka Singh stars with the ball as #TeamIndia bowl out Sri Lanka for 173. #SLvIND
We will be back for India's chase shortly. 👍 👍
Scorecard 👉 https://t.co/XOkhAjAZvT pic.twitter.com/Ek6LaGA1zj
">𝗜𝗻𝗻𝗶𝗻𝗴𝘀 𝗕𝗿𝗲𝗮𝗸!
— BCCI Women (@BCCIWomen) July 4, 2022
Renuka Singh stars with the ball as #TeamIndia bowl out Sri Lanka for 173. #SLvIND
We will be back for India's chase shortly. 👍 👍
Scorecard 👉 https://t.co/XOkhAjAZvT pic.twitter.com/Ek6LaGA1zj𝗜𝗻𝗻𝗶𝗻𝗴𝘀 𝗕𝗿𝗲𝗮𝗸!
— BCCI Women (@BCCIWomen) July 4, 2022
Renuka Singh stars with the ball as #TeamIndia bowl out Sri Lanka for 173. #SLvIND
We will be back for India's chase shortly. 👍 👍
Scorecard 👉 https://t.co/XOkhAjAZvT pic.twitter.com/Ek6LaGA1zj
भारताची स्टार सलामीवीर स्मृती मंधाना ( Star opener Smriti Mandhana ) आणि शेफाली वर्मा यांनी या सामन्यात शानदार फलंदाजी केली. या दोघींनी अर्धशतके ठोकत भारतीय संघाला एकदिवसीय मालिकेत सहज विजय मिळवून दिला. स्मृतीने 83 चेंडूत नाबाद 94 आणि शेफालीने 71 चेंडूत नाबाद 71 धावा केल्या.
-
Renuka Singh scalped 4⃣ wickets & bagged the Player of the Match award as #TeamIndia won the second #SLvIND ODI. 👏 👏
— BCCI Women (@BCCIWomen) July 4, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Scorecard 👉 https://t.co/XOkhAjSAUt pic.twitter.com/YxWvZ212ed
">Renuka Singh scalped 4⃣ wickets & bagged the Player of the Match award as #TeamIndia won the second #SLvIND ODI. 👏 👏
— BCCI Women (@BCCIWomen) July 4, 2022
Scorecard 👉 https://t.co/XOkhAjSAUt pic.twitter.com/YxWvZ212edRenuka Singh scalped 4⃣ wickets & bagged the Player of the Match award as #TeamIndia won the second #SLvIND ODI. 👏 👏
— BCCI Women (@BCCIWomen) July 4, 2022
Scorecard 👉 https://t.co/XOkhAjSAUt pic.twitter.com/YxWvZ212ed
या सामन्यात भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून ( Captain Harmanpreet Kaur won the toss ) प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताकडून उत्तम गोलंदाजी झाली आणि रेणुका सिंगने 10 षटकांत 1 मेडन आणि 28 धावा देत सर्वाधिक चार बळी घेतले. त्यांच्याशिवाय मेघना सिंग आणि दीप्ती शर्मा यांनीही किफायतशीर गोलंदाजी करत 2-2 बळी घेतले. यामुळे यजमानांचा संघ निर्धारित 50 षटकांत 173 धावा करत सर्वबाद झाला.
174 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची एकही विकेट पडली नाही. उपकर्णधार स्मृती मंधाना आणि तिची सहकारी सलामीवीर शेफाली वर्मा ( Opener Shefali Verma ) यांनी पहिल्या विकेटसाठी नाबाद धावांची भागीदारी केली आणि संघाला 10 गडी राखून सामना जिंकून दिला. भारताने 174 धावांचे लक्ष्य 25.4 षटकात पूर्ण केले. यासह भारताने आता वनडे मालिकेवर कब्जा केला आहे.
-
2ND WODI. India Women Won by 10 Wicket(s) https://t.co/7A3NxTPVMB #SLvIND
— BCCI Women (@BCCIWomen) July 4, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">2ND WODI. India Women Won by 10 Wicket(s) https://t.co/7A3NxTPVMB #SLvIND
— BCCI Women (@BCCIWomen) July 4, 20222ND WODI. India Women Won by 10 Wicket(s) https://t.co/7A3NxTPVMB #SLvIND
— BCCI Women (@BCCIWomen) July 4, 2022
भारतासाठी, या दोन्ही सलामीवीरांनी श्रीलंकेविरुद्ध वनडेतील ही सर्वात मोठी सलामीची भागीदारी केली आहे. याशिवाय एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मा यांच्यातील ही पहिली शतकी भागीदारी आहे. बराच वेळ या दोघींची बॅट शांत असल्याने संघ व्यवस्थापन चिंतेत होता. पण आता ही चिंता दूर झाली आहे. मालिकेतील शेवटचा एकदिवसीय सामना 7 जुलै रोजी होणार आहे.