नवी दिल्ली : सध्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाचा दिग्गज फिरकी गोलंदाज आर आश्विनची निवड करण्यात आलेली नाही. त्यामुळे तो वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेचा भाग नाही. आश्विनने भारतीय संघाचा माजी कर्णधार धोनीबाबत एक वक्तव्य (Ashwin's statement about Dhoni) केले आहे.
आर आश्विन म्हणाला, आयपीएल स्पर्धेत सीएसके (Chennai Super Kings) संघासाठी एम एस धोनीचे नेतृत्व जसे महत्वाचे आहे. त्याचबरोबर त्याची मॅच फिनिश करण्याचे कौशल्य देखील महत्वपूर्ण आहे. आश्विनच्या मते, धोनीच्या नेतृत्वाबद्दल जेवढे बोलले जाते, तेवढे त्याच्या मॅच फिनिश करण्याच्या कौशल्यावर चर्चा केली जात नाही. मात्र तो एक जबरदस्त मॅच फिनिशर आहे. आर आश्विन आपल्या यूट्यूब चॅनेलवर आयपीएल लिलावा बाबत फिनिशर्सच्या पर्यायावर बोलत (Ashwin spoke about the match finisher) होता. त्याच्यामते आता सध्या आयपीएल स्पर्धेत असे काही खेळाडू आहेत. जे लोअर ऑर्डरमध्ये फलंदाजी करताना मॅच फिनिश करण्याची क्षमता ठेवतात.
एमएस धोनी एक शानदार मॅच फिनिशर सु्द्धा आहे - आर आश्विन
आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना आर आश्विनने धोनीच्या मॅच फिनिश करण्याच्या क्षमतेवर प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, "लोकं आज सीएसके आणि त्यांच्या यशाबद्दल चर्चा करतात. त्याचबरोबर कर्णधार धोनीच्या नेतृत्वाबद्दल बरेच काही बोलले जाते. दरम्यान धोनीकडे नेतृत्वा बरोबरच अजून एक कौशल्य आहे. ज्याबद्दल जास्त बोलले जात नाही. आपण नेहमी त्याच्या नेतृत्वाबद्दल बोलतो (Discussion on captain Dhoni leadership), मात्र तो ज्या प्रकारे बॅटने मॅच फिनिश करतो त्याच्याबद्दल जास्त बोलले जात नाही. त्याबद्दल खुप कमी प्रमाणात चर्चा केली जाते. अशा वेळी जेव्हा संघाला 20 चेंडूत 60 धावांची गरज असते, त्यावेळी धोनी मैदानात येऊन ताबडतोब चौकार-षटकार लगावतो. तो शेवटच्या षटकात 15 धावा देखील काढतो. असा कारनामा त्याने बऱ्याचवेळा केला आहे. अशा प्रकारच्या सामन्यात धोनीने फिनिशरची भूमिका बजावली आहे. जे खुप प्रेरणादायी आहे. त्यामुळे संघाचे मनोबल खुप जास्त वाढते."