कोलंबो : श्रीलंका क्रिकेट बोर्डीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या खेळाडूंसाठी नवीन नियमावली जारी केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ इच्छिणाऱ्या श्रीलंकेच्या खेळाडूंना तीन महिन्यांची नोटीस द्यावी लागेल आणि निवृत्तीनंतर सहा महिने फ्रँचायझी आधारित टी-२० लीगमध्ये खेळण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र ( NOC ) साठी प्रतीक्षा करावी लागेल. श्रीलंका क्रिकेट ( SLC ) निवृत्तीपूर्वी आणि किफायतशीर टी-20 देशांतर्गत लीगमध्ये जाणे टाळण्यासाठी ही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, लंका प्रीमियर लीग (LPL) मध्ये खेळण्यासाठी पात्र होण्यासाठी, खेळाडूंना हंगामातील किमान 80 टक्के सामने खेळावे लागतील. दनुष्का गुणातिलक आणि भानुका राजपक्षे यांनी निवृती घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. गुणातिलकने कसोटी क्रिकेटला अलविदा म्हटले आहे, तर राजपक्षे यांनी सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
राष्ट्रीय क्रिकेट संघातून निवृत्त होऊ इच्छिणाऱ्या राष्ट्रीय खेळाडूंनी श्रीलंका क्रिकेटला तीन महिन्यांची नोटीस दिली पाहिजे की ते निवृत्ती घेऊ इच्छितात, असे एसएलसीने ( SLC ) शनिवारी एका निवेदनात म्हटले आहे. निवेदनानुसार, विदेशी फ्रेंचायझी लीगमध्ये खेळण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मागणाऱ्या निवृत्त राष्ट्रीय खेळाडूंना निवृत्तीच्या तारखेपासून सहा महिन्यांनंतरच प्रमाणपत्र दिले जाईल.
बोर्डाने सांगितले की, निवृत्त राष्ट्रीय खेळाडूंनी लीगच्या आधीच्या हंगामात देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये 80 टक्के सामने खेळले तरच ते एलपाएल ( LPL ) सारख्या देशांतर्गत लीगमध्ये खेळण्यास पात्र असतील. असे मानले जाते की संबंधित एसएलसीने ( SLC ) ही नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. कारण नवीन अनिवार्य फिटनेस आवश्यकता लक्षात घेता, अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार करू शकतात.