ETV Bharat / sports

IPL Mega Auction: आयपीएल लिलावात श्रेयस, चहल आणि वॉर्नरला टॉप ड्रॉमध्ये स्थान मिळण्याची शक्यता - IPL Mega Auction

पुढील महिन्यात होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) लिलावात अनेक खेळाडूंना टॉप ड्रॉमध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. या लिलावासाठी 1,200 हून अधिक खेळाडूंनी नोंदणी केली आहे.

आयपीएल लिलाव 2022
आयपीएल लिलाव 2022
author img

By

Published : Jan 22, 2022, 3:45 PM IST

नवी दिल्ली - भारतीय फलंदाज श्रेयस अय्यर आणि फिरकीपटू युझवेंद्र चहल याच्याशिवाय ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज डेव्हिड वॉर्नर पुढील महिन्यात होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) लिलावाच्या टॉप ड्रॉमध्ये स्थान मिळवण्याची शक्यता आहे. या लिलावासाठी 1,200 हून अधिक खेळाडूंनी नोंदणी केली आहे.

श्रेयस आणि युझवेंद्र व्यतिरिक्त, 10 संघ भारतीय खेळाडूंवर बोली लावतील यामध्ये वरिष्ठ सलामीवीर शिखर धवन, फलंदाज इशान किशन, वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर आणि दीपक चहर, गेल्या वेळी सर्वाधिक बळी घेणारे हर्षल पटेल आणि आवेश खान आणि फिरकी गोलंदाज राहुल चहर आणि अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर यांचा समावेश असेल.

या भारतीय खेळाडूंसाठी 7 ते 15 कोटी रुपयांपर्यंत बोली लावली जाऊ शकते. तर परदेशी खेळाडूंमध्ये वॉर्नर आणि दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा, इंग्लंडचा मार्क वुड, ऑस्ट्रेलियाचा मिचेल मार्श आणि पॅट कमिन्स आणि न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट यांच्यावर मोठी बोली लागू शकते. त्याची फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्ज पुन्हा फाफ डू प्लेसिस आणि ड्वेन ब्राव्हो सारख्या खेळाडूंमध्ये रस दाखवू शकते.

IPL 2022 च्या लिलावासाठी एकूण 1,214 खेळाडूंनी (896 भारतीय आणि 318 परदेशी) नोंदणी केली आहे, असे IPL ने शनिवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. हा लिलाव 12 आणि 13 फेब्रुवारीला बेंगळुरूमध्ये होणार आहे. खेळाडूंच्या लिलावापूर्वी विविध संघांनी एकूण 33 खेळाडूंना कायम ठेवले आहे किंवा त्यांची निवड केली आहे. सध्याच्या आठ आयपीएल फ्रँचायझींनी एकूण 27 खेळाडूंना कायम ठेवले आहे. यात चेन्नई सुपर किंग्जमध्ये महेंद्रसिंग धोनी, मुंबई इंडियन्समध्ये रोहित शर्मा आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये विराट कोहली यांचा समावेश आहे.

दोन नवीन आयपीएल संघांनी सहा खेळाडूंची निवड केली आहे. यामध्ये हार्दिक पंड्या अहमदाबाद फ्रँचायझीचा कर्णधार आणि केएल राहुलची लखनौ फ्रँचायझीचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, केन विल्यमसन, जोस बटलर, ग्लेन मॅक्सवेल इत्यादी खेळाडूंना कायम ठेवण्यात आले आहे. यावेळी भूतानच्या एका खेळाडूनेही नोंदणी केली आहे, तर अमेरिकेतील विक्रमी 14 खेळाडूंनी नोंदणी केली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या सर्वाधिक 59 आणि दक्षिण आफ्रिकेच्या 48 परदेशातील खेळाडूंनी लिलावासाठी आपला दावा सादर केला आहे. याशिवाय वेस्ट इंडिज (41), श्रीलंका (36), इंग्लंड (30), न्यूझीलंड (29) आणि अफगाणिस्तान (20) हे आणखी काही देश आहेत जिथून अनेक खेळाडूंनी नोंदणी केली आहे. नामिबिया (5), नेपाळ (15), नेदरलँड (1), ओमान (3), स्कॉटलंड (1), झिम्बाब्वे (2), आयर्लंड (3) आणि संयुक्त अरब अमिराती (1) हे खेळाडूही या लिलावात सहभागी होणार आहेत.

हेही वाचा - Anand Mahindra Gifts Car To Avani : पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेती अवनी लेखरा हिला आनंद महिंद्राकडून कार भेट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.