ETV Bharat / sports

Singer Lata Mangeshkar : 1883 चा विश्वचषक विजेता संघ आणि बीसीसीआय लतादीदींचे ऋणी - शर्मिला टागोर - कर्णधार मंसूर अली खान पतौडी

स्वर कोकिळा लता मंगेशकर (Singer Lata Mangeshkar) ६ फेब्रुवारीला आपल्या सर्वांना सोडून गेल्या. लतादीदी यांच्याबद्दल बोलताना अभिनेत्री शर्मिला टागोर म्हणाल्या 1983 चा भारतीय संघ आणि बीसीसीआय लतादीदींचे ऋणी आहेत. त्याचबोरबर त्यांनी 1983 च्या आठवणींना उजाळा दिला आहे.

Lata Mangeshkar
Lata Mangeshkar
author img

By

Published : Feb 7, 2022, 5:44 PM IST

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे दिवंगत कर्णधार मंसूर अली खान पतौडी (Former captain Mansoor Ali Khan Pataudi) यांची पत्नी शर्मिला टागोर यांनी एक खुलासा केला आहे की, गोनकोकीळा लता मंगेशकर यांनी 1983 साली विश्वचषक विजेत्या भारतीय संघासाठी 20 लाक रुपये जमा केले होते. ज्यांचे काल (रविवारी) सकाळी निधन झाले. त्यांनी 92 वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. अभिनेत्री शर्मिला टागोर म्हणाल्या की, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) ही किफायतशीर संस्था नव्हती आणि त्यांच्याकडे खेळाडूंचा सन्मान करण्यासाठी पैसा नव्हता.

लता मंगेशकर यांनी 20 लाख रुपयांचा निधी गोळा -

शर्मिला टागोर यांनी रविवारी आज तकला सांगितले की, लता मंगेशकर यांनी क्रिकेटची फार आवड (Lata Mangeshkar loved cricket) होती. जेव्हा 1983 साली जेव्हा भारतीय संघाने पहिल्यांदा विश्वचषक जिंकला होता, तेव्हा लता मंगेशकर यांनी आपले भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांच्यासोबत मिळून भारतीय संघासाठी निधी गोळा केला होता. त्यांनी भारतीय संघासाठी त्याकाळी 20 लाख रुपयांचा निधी गोळा केला होता.

लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण -

1983 च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघासोबत लता मंगेशकर

अभिनेत्री शर्मिला टागोर (Actress Sharmila Tagore) पुढे म्हणाल्या, त्यावेळी बीसीसीआयकडे इतके पैसे नव्हते. गोव्यासाठीही, सुधीर फडके साहेबांसोबत (जे गोवा स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होते) त्यांनी गोवा लिबरेशनसाठी एक मैफिली केली आणि त्यात त्यांनीही योगदान दिले. ८ जानेवारी रोजी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्याने मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि ६ फेब्रुवारी रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

तसेच 1983 विश्वकप विजेता भारतीय संघाचे (1983 World Cup winning Indian team) सदस्य, कीर्ती आझाद यांनी महान गायिका लता मंगेशकर यांच्यासोबत घालवलेले क्षण आठवले. नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी स्टेडिअमध्ये ट्रॉफी (Indira Gandhi Stadium) घेऊन उभ्या असलेल्या भारतीय संघासोबत लता मंगेशकर असणारा एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये माजी कर्णधार कपिल देव आणि मोहिंदर अमरनाथ देखील सामिल होते.

आझादने लिहिले, लता दीदी, आम्ही तुम्हाला मिस करू. 83 चा संपूर्ण विश्वचषक विजेता संघ तुमचे योगदान कधीही विसरणार नाही. लता मंगेशकर आम्ही आयुष्यभर तुमचे ऋणी राहू. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी लता मंगेशकर यांचा आवाज कसा जुना झाला नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आणि ट्विटमध्ये त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.