ETV Bharat / sports

Shane Watson Statement : दिल्लीच्या उर्वरित सामन्यांमध्ये पृथ्वी शॉ खेळण्याची शक्यता नाही - शेन वॉटसन - पृथ्वी शॉ तापामुळे रुग्णालयात दाखल

पृथ्वी शॉच्या एका इंस्टाग्रामवरून उघड झाले आहे की, सलामीवीराला तापामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शेन वॉटसन म्हणाला, मला त्याच्या आजाराबाबत नीट माहिती नाही. मात्र गेल्या काही आठवड्यांपासून त्याला ताप आहे, जो प्रत्यक्षात आढळून येत आहे.

Prithvi Shaw
Prithvi Shaw
author img

By

Published : May 13, 2022, 8:16 PM IST

मुंबई: दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉ ( Delhi Capitals opener Prithvi Shaw ) आयपीएल 2022 च्या शेवटच्या दोन साखळी सामने खेळण्याची शक्यता नगण्य आहे. पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यांमध्ये हा युवा फलंदाज खेळण्याची शक्यता कमी असल्याचे सहाय्यक प्रशिक्षक शेन वॉटसन ( Assistant Coach Shane Watson ) यांनी सूचित केले आहे. तो 1 मे रोजी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध शेवटचा सामना खेळला होता.

पृथ्वी शॉ सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स विरुद्ध डीसीचे शेवटचे तीन लीग सामने खेळू शकला नाही. 8 मे रोजी शॉच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून उघड झाले की, सलामीवीर तापामुळे रुग्णालयात दाखल झाला होता. त्यानंतर आता शेन वॉटसनने ( Shane Watson Statement ) त्याच्याबद्दल माहिती दिली आहे.

शेन वॉटसन म्हणाला, मला त्याच्या आजाराबाबत नीट माहिती नाही. मात्र गेल्या काही आठवड्यांपासून त्याला ताप आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये उपलब्ध नसणे त्याच्यासाठी चांगले राहिले नाही, ही खेदाची बाब आहे. तो अविश्वसनीयपणे कुशल युवा फलंदाज आहे. जो जगातील सर्वोत्तम गोलंदाजांविरुद्ध चांगला खेळतो. शॉने नऊ सामन्यांमध्ये 28.78 च्या सरासरीने आणि 159.87 च्या स्ट्राइक रेटने 259 धावा केल्या आहेत, ज्यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे.

वॉटसन पुढे म्हणाला, तो संघासोबत नाही हे आमच्यासाठी मोठे नुकसान आहे. गेल्या काही आठवड्यांपासून त्यांची प्रकृती ढासळत होती. तो लवकरच पूर्ण बरा होऊन परतेल अशी अपेक्षा आहे, परंतु दुर्दैवाने तो शेवटच्या दोन सामन्यांना उपस्थित राहू शकणार नाही. यापूर्वी, दिल्लीने राजस्थान रॉयल्सवर आठ विकेट्सने विजय मिळवल्यानंतर एका मुलाखतीत मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग म्हणाले होते की, पृथ्वी स्पर्धेबाहेर आहे. त्याचवेळी, सामन्यानंतर कर्णधार ऋषभ पंतने लीग टप्प्यात शॉच्या उपलब्धतेवर फारसे काही सांगितले नाही.

दिल्ली सध्या 12 सामन्यांतून 12 गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. सोमवारी डीवाय पाटील स्टेडियमवर त्यांची प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याच्या संधी मजबूत करण्यासाठी पंजाबशी सामना होईल.

हेही वाचा - Ipl 2022 Updates : खराब कामगिरीनंतर डॅनियल सॅम्सनचे जबरदस्त पुनरागमन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.