मुंबई : जगातील सर्वात मोठी टी-20 लीग म्हणून आयपीएल स्पर्धेला ओळखले जाते. या आयपीएल स्पर्धेचा यंदा 15 वा हंगाम ( 15th season of IPL ) खेळला जाणार आहे. तसेच या हंगामाला 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेपूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघाकडून मोठी बाातमी माहिती समोर आली आहे. या संघाने दिल्ली कॅपिटल्स फ्रेंचायझीने ( Delhi Capitals franchise ) आयपीएल 2022 या हंगामासाठी शेन वॉटसनला सहाय्यक कोच म्हणून नियुक्त केले आहे.
-
🚨 ANNOUNCEMENT 🚨
— Delhi Capitals (@DelhiCapitals) March 15, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
It gives us great pleasure to welcome one of the greatest T20 all-rounders & a bona fide IPL legend to the Delhi Capitals as an Assistant Coach 🤩
Can't wait to have you in the DC camp, @ShaneRWatson33 💙
🔗 https://t.co/kKUDaKwPXc#YehHaiNayiDilli #IPL2022 pic.twitter.com/B5u2RdkKIj
">🚨 ANNOUNCEMENT 🚨
— Delhi Capitals (@DelhiCapitals) March 15, 2022

🔗 https://t.co/kKUDaKwPXc#YehHaiNayiDilli #IPL2022 pic.twitter.com/B5u2RdkKIj🚨 ANNOUNCEMENT 🚨
— Delhi Capitals (@DelhiCapitals) March 15, 2022
It gives us great pleasure to welcome one of the greatest T20 all-rounders & a bona fide IPL legend to the Delhi Capitals as an Assistant Coach 🤩
Can't wait to have you in the DC camp, @ShaneRWatson33 💙
🔗 https://t.co/kKUDaKwPXc#YehHaiNayiDilli #IPL2022 pic.twitter.com/B5u2RdkKIj
दिल्ली कॅपिटल्स फ्रेंचायझीने आयपीएल 2022 ( IPL 2022 ) या हंगामासाठी शेन वॉटसनला सहाय्यक कोच म्हणून नियुक्त ( Appointed Shane Watson as assistant coach) करण्यागोदर, 40 वर्षीय रिकी पाँटिंग (मुख्य प्रशिक्षक), प्रवीण अमरे (सहाय्यक प्रशिक्षक), अजित आगरकर (सहाय्यक प्रशिक्षक) आणि जेम्स होप्स (गोलंदाजी प्रशिक्षक) यांचा डीसी कोचिंग स्टाफमध्ये समावेश आहे.
यावर वॉटसन म्हणाला, ''आयपीएल ही जगातील सर्वोत्तम टी-20 स्पर्धा आहे. एक खेळाडू म्हणून माझ्याकडे अविश्वसनीय आठवणी आहेत, सर्वप्रथम राजस्थान रॉयल्सने 2008 साली जिंकले होते, ज्याचे नेतृत्व शेन वॉर्नने केले होते. एक खेळाडू म्हणून माझ्याकडे अतुलनीय आठवणी आहेत. आता मला प्रशिक्षक होण्याची संधी मिळाली आहे. महान रिकी पाँटिंगच्या ( The great Ricky Ponting ) नेतृत्वाखाली काम करण्याची ही उत्तम संधी आहे. एक कर्णधार म्हणून तो एक अप्रतिम लीडर होता आणि आता तो जगातील सर्वोत्तम प्रशिक्षकांपैकी एक आहे. मी डीसीचा भाग होण्यासाठी खरोखरच उत्साहित आहे.
-
Winner of the inaugural IPL in 2008 ➡️ Winner of the 2018 IPL and Player of the Final ➡️ Joins Delhi Capitals as Assistant Coach to help in the quest for our first IPL title 🤩
— Delhi Capitals (@DelhiCapitals) March 15, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Join us in giving @ShaneRWatson33 a hearty welcome 💙#YehHaiNayiDilli #IPL2022 pic.twitter.com/EkCRcJpU4S
">Winner of the inaugural IPL in 2008 ➡️ Winner of the 2018 IPL and Player of the Final ➡️ Joins Delhi Capitals as Assistant Coach to help in the quest for our first IPL title 🤩
— Delhi Capitals (@DelhiCapitals) March 15, 2022
Join us in giving @ShaneRWatson33 a hearty welcome 💙#YehHaiNayiDilli #IPL2022 pic.twitter.com/EkCRcJpU4SWinner of the inaugural IPL in 2008 ➡️ Winner of the 2018 IPL and Player of the Final ➡️ Joins Delhi Capitals as Assistant Coach to help in the quest for our first IPL title 🤩
— Delhi Capitals (@DelhiCapitals) March 15, 2022
Join us in giving @ShaneRWatson33 a hearty welcome 💙#YehHaiNayiDilli #IPL2022 pic.twitter.com/EkCRcJpU4S
तो म्हणाला, दिल्ली कॅपिटल्स सोबत, त्याला शानदार संघ मिळाला आहे. आता त्यांचा पहिला खिताब जिंकण्याची वेळ ( Time to win the first title ) आहे. मी तिथे पोहचण्यासाठी उत्सुक आहे. युवा खेळाडूंना जिंकवण्यासाठी हवी ती मदत करण्यासाठी मी तयार आहे. त्यामुळे मला आशा आहे की, आम्ही पहिल्यांदा लीग जिंकू. तिथे पोहचण्यासाठी आता मी प्रतिक्षा करु शकत नाही.
शेन वॉटसनची आयपीएल कारकीर्द ( Shane Watson's IPL career ) -
शेन वॉटसनने आपल्या आयपीएल कारकिर्दीत तीन संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. ज्यामध्ये राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्स संघांचा समावेश आहे. त्याने आतापर्यंत आयपीएल स्पर्धेत 145 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने चार शतके लगावली आहेत. त्याचबरोबर 3874 धावा केल्या आहेत. तसेच 92 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने निवृतीपूर्वी शेवटचा हंगाम चेन्नई संघाकडून खेळला आहे.