ETV Bharat / sports

Shane Warne private funeral : शेन वार्नला कुटुंबिय आणि मित्रांनी दिला अखेरचा निरोप

author img

By

Published : Mar 20, 2022, 8:14 PM IST

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नला ( Veteran Australian spinner Shane Warne ) एका खासगी अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमात त्याच्या कुटुंबियांनी आणि मित्रांनी अखेरचा निरोप दिला.

Shane Warne
Shane Warne

मेलबर्न : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न याचे 4 मार्च रोजी थायलंड येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन ( Shane Warne Passes Away ) झाले होते. त्यानंतर एका आठवड्यानंतर शेन वार्नचे पार्थिव बँकॉक मधून मेलबर्न येथे आणण्यात आले. त्यानंतर त्याच्या कुटुंबिय आणि काही निवडक मित्रांनी एका खासगी कार्यक्रमात अखेरचा निरोप दिला. हा अंत्यसंस्कार कार्यक्रम मुराबिनमध्ये पार पडला.

या अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमात वॉर्नची जॅक्सन, ब्रुक आणि समर ही तिन्ही मुले उपस्थित होती. तसेच त्याचे आई-वडील किथ आणि ब्रिजिट देखील उपस्थित होते. याशिवाय शेन वार्नच्या या कार्यक्रमासाठी मार्क टेलर, तसेच ऍलेन बॉर्डर, ग्लेन मॅकग्रा आणि इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन यांच्यासह 80 लोकांचा समावेश होता. अंत्यसंस्कारासाठी आमंत्रित पाहुण्यांना सेंट किल्डा स्कार्फ घालण्यास सांगितले होते.

  • Shane Warne's family and friends bid the cricketing legend farewell at a private memorial service at the St Kilda Football Club in Melbourne pic.twitter.com/nCQGROALqa

    — Muhaamad Faisal (@Malikfassi47) March 20, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

तसेच ते वॉर्नच्या शवपेटीवरही गुंडाळले गेले होते. वॉर्न सेंट किल्डा फुटबॉल क्लबशीदेखील ( St. Kilda Football Club ) संबंधीत आहे. वॉर्नची शवपेटी नेत असताना 1970 च्या बिल मेडले आणि जेनिफर वॉर्न्स यांचे हिट गाणे 'द टाइम ऑफ माय लाइफ' ( The Time of My Life ) हे वाजविण्यात आले.

वॉर्नवर ३० मार्च रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यामध्ये सर्वसामान्यांनाही सहभागी होता येणार आहे. हे अंत्यसंस्कार मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणार आहेत. यावेळी, एमसीजी (MCG) च्या ग्रेट सदर्न स्टँडला शेन वॉर्नचे नाव देण्यात येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.