ब्रिस्टोल - इंग्लंड महिला क्रिकेट संघ आणि भारतीय महिला क्रिकेट संघ यांच्यात ब्रिस्टोलच्या मैदानात कसोटी सामना रंगला आहे. भारतीय संघ या सामन्यात पिछाडीवर असून इंग्लंडने भारताला फॉलोऑन दिला आहे. परंतु या सामन्यात भारतीय संघाची युवा सलामीवीर शफाली वर्माने एक खास विक्रम आपल्या नावे केला आहे.
महिला क्रिकेटमध्ये शफालीने एक कसोटी सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम केला आहे. तिला इंग्लंडविरुद्धच्या सुरू असलेल्या सामन्यात पदार्पणाची संधी मिळाली. या सामन्यात शफालीने दोन्ही डावात मिळून ३ षटकार ठोकले. अशा विक्रम महिला क्रिकेट विश्वात अद्याप कोणत्याही खेळाडूला करता आलेला नाही. महिला क्रिकेटमध्ये खेळाडू एका सामन्यात एक किंवा दोन षटकार ठोकू शकले आहेत. परंतु शफालीने पहिल्याच सामन्यात तीन षटकार ठोकत हा विक्रम आपल्या नावे केला.
शफाली त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखली जाते. यामुळे तिला लेडी सेहवाग म्हणून देखील म्हटलं जातं. शफालीने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात खेळताना २ षटकार ठोकले. तर दुसऱ्या डावात तिने एक षटकार ठोकला. तिने पहिल्या डावात ९६ धावा केल्या. तिचे शतक अवघे ४ धावांनी हुकले. तर दुसऱ्या डावात तिने ६३ धावा केल्या. भारतीय संघ या सामन्यात सद्यघडीला पराभवाच्या छायेत आहे.
हेही वाचा - भारताचे महान धावपटू मिल्खा सिंह यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
हेही वाचा - WTC Final : न्यूझीलंडविरुद्ध विराटने नाणेफेक गमावली तर काय होतं, जाणून घ्या रेकॉर्ड