मेलबर्न : यंदा आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेला 16 ऑक्टोबरपासून सुरुवात आहे. त्याचबरोबर ही स्पर्धा 19 नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे. तसेच या स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी असलेले भारत आणि पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडताना (India vs Pakistan cricket match) दिसणार आहेत. भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ एकाच गटात आहेत. त्यामुळे या हायव्होल्टेज सामन्याची तिकिटे अवघ्या चार तासात 60 हजारपर्यंत विक्री झाली आहेत.
भारत विरुद्ध पाकिस्तान (India-Pakistan match) हा सामना 23 ऑक्टोबरला खेळला जाणार आहे. या अगोदरच या सामन्याची तिकिटे विकली गेली आहेत. विशेष म्हणजे अवघ्या चार तासात तब्बल 60 हजार तिकिटे विकली गेली आहेत. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळला जाणार आहे.
मेलबर्न क्रिकेट स्टेडियमची (Melbourne Cricket Stadium) क्षमता सुमारे 1 लाख आहे. त्यापैकी आयसीसीने आता फक्त 60 हजार तिकिटांची विक्री केली आहे. कारण कोरोना महामारीच्या साथीमुळे प्रेक्षकांची प्रत्यक्ष मैदानावरील उपस्थिती कमी करण्यात आली आहे. जरी असे असले तरी किमान 60 हजार प्रेक्षकांना मैदानावर उपस्थित सामना पाहण्याची पवाणगी मिळणार आहे. महत्वाचे म्हणजे या सामन्याची 60 तिकिटे अवघ्या चार तास विकली गेली आहेत.
त्याचबरोबर आयसीसीने वेटींग लिस्टच्या आधारने काही प्रेक्षकांना तिकिटे देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच वेटींग लिस्टच्या प्रेक्षकांना हा सामना पाहण्यासाठी 1 लाख रुपये मोजावे लागण्याची शक्यता आहे. मागील विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान आमने सामने (India and Pakistan in the World Cup) आले होते. या सामन्यात भारतीय संघाला दारुन पराभव स्वीकारावा लागला होता. तसेच आयसीसीच्या स्पर्धेतील पाकिस्तान विरुद्ध प्रथमच पराभव स्वीकारावा लागला होता. त्याचबरोबर अजिंक्य राहण्याची मालिका खंडीत झाली होती.