ETV Bharat / sports

WPL 2023 RCB Vs MI : मुंबई इंडियन्सचा रॉयल चॅलेंजर्सवर 4 विकेट राखून विजय; महिला आयपीएलमध्ये एमआय बनली नंबर 1 चा संघ - मुंबई इंडियंस बनाम आरसीबी

महिला प्रीमियर लीग 2023 चा 19 वा सामना आज मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जात आहे. आरसीबी प्लेऑफमधून बाहेर आहे. मुंबई इंडियन्ससाठी पॉइंट टेबलमध्ये पहिले स्थान मिळवण्यासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. मुंबई इंडियन्स 7 पैकी 5 सामने जिंकून गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. RCB 7 सामन्यांपैकी 2 विजयांसह चौथ्या क्रमांकावर आहे.

मुंबई इंडियन्सचा रॉयल चॅलेंजर्सवर दणदणीत विजय
WPL 2023 RCB Vs MI
author img

By

Published : Mar 21, 2023, 7:04 PM IST

Updated : Mar 21, 2023, 7:25 PM IST

मुंबई : महिला प्रीमियर लीग 2023 चा 19 वा सामना आज मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जात आहे. आरसीबी प्लेऑफमधून बाहेर आहे. मुंबई इंडियन्ससाठी पॉइंट टेबलमध्ये पहिले स्थान मिळवण्यासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. मुंबई इंडियन्स 7 पैकी 5 सामने जिंकून गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. RCB 7 सामन्यांपैकी 2 विजयांसह चौथ्या क्रमांकावर आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्रथम फलंदाजी करताना : प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने मुंबई इंडियन्सला 126 धावांचे टार्गेट दिले आहे. आरसीबीने 20 षटकांत 9 विकेट गमावून 125 धावा केल्या. मुंबई इंडियन्सला आता 126 धावा कराव्या लागणार आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पहिला डाव : प्रथम फलंदाजी करताना आरसीबीकडून स्मृती मंधाना आणि एस डेव्हिनने डावाची सुरुवात केली. आज स्मृतीने 25 चेंडूत 24 धावा केल्या असल्या तरी स्मृतीला चांगली कामगिरी करता आली नाही. तिच्या बरोबर आलेल्या एस डेव्हीनला खातेसुद्धा उघडता आले नाही. त्यानंतर आलेल्या एलिस पेरीने 38 चेंडूत 29 धावा करून संघाच्या धावसंख्येला चांगला आकार दिला. त्याचबरोबर एच नाईट 13 चेंडूत 12 धावा करून तंबूत परतली. कानिका अहुजा हिने 13 चेंडूत 12 धावा केल्या. त्यानंतर आलेल्या रिचा घोषने आक्रमक खेळी करीत 13 चेंडूत 29 धावा करून संघाची धावसंख्या वाढवली.

मुंबई इंडियन्सची खेळी : मुंबई इंडियन्सने 129 धावांचे लक्ष्य पार करताना मुंबईकडून हेली मॅथ्यूस आणि यास्तिका भाटिया यांनी डावाची सुरुवात चांगली केली. त्यांनी पहिल्या प्ले आॅफमध्ये संघाच्या धावसंख्येला चांगला आकार दिला. हेली मॅथ्यूसने 17 चेंडूत 24 धावा केल्या, तर यास्तिका भाटियाने 26 चेंडूत 30 धावा करून मुंबई इंडियन्सला चांगला आकार दिला. त्यानंतर अमेली केरने 27 चेंडूत नाबाद 31 धावा करून संघाला विजयापर्यंत नेले. त्यानंतर पूजा वस्त्राकारने 18 चेंडूत 19 धावा केल्या. इसी वोंगला खाते उघडता आले नाही.

राॅयल चॅलेंजर्सचा अर्धा संघ तंबूत परतल्यानंतर खालच्या फळीतील खेळाडू एकामागोमाग बाद होऊन तंबूत परतले. श्रेयंका पाटील, आशा शोभना यांनी प्रत्येकी 4 धावांची भर टाकली. त्यानंतर मेगन शट आणि दिशा कासट यांनी प्रत्येकी 2 धावा केल्या.

मुंबई इंडियन्स संघ : हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नाट सिव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (क), अमेलिया कार, पूजा वस्त्राकर, इसी वोंग, अमनजोत कौर, हुमैरा काझी, जिंतिमनी कलिता, सायका इशाक.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ : स्मृती मानधना, सोफी डेव्हाईन, एलिस पेरी, हीदर नाइट, दिशा कसाट, रिचा घोष, कनिका आहुजा, श्रेयंका पाटील, मेगन शुट, प्रीती बोस, शोभना आशा.

Last Updated : Mar 21, 2023, 7:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.