ETV Bharat / sports

Rohit Sharma Statement : भारतीय फलंदाजांनी धावांचा पाठलाग करण्यास सक्षम असले पाहिजे - रोहित शर्मा

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा ( Captain Rohit Sharma ) म्हणाला की, आम्हाला आमची फलंदाजी कशी सुधारता येईल यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. कारण खेळाची परिस्थिती कशीही असली तरी तुम्ही स्वतःला साथ दिली तर धावा मिळतील.

Rohit Sharma
रोहित शर्मा
author img

By

Published : Jul 15, 2022, 4:19 PM IST

लंडन : ओव्हल मैदानावर झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि शिखर धवन या सलामीच्या जोडीने 111 धावांचे लक्ष्य सहज गाठले. पण लॉर्ड्सवरील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लिश परिस्थितीत 247 धावांचा पाठलाग करताना भारतीय टॉप ऑर्डरला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. खेळपट्टीने इंग्लंडच्या गोलंदाजांना मदत केल्याने, रीस टोपलीने भारतीय आघाडीच्या फळीवर आक्रमन केले. त्यामुळे भारताला 100 धावांनी पराभव पत्करावा लागला. त्यानंतर रोहित शर्माने प्रतिक्रिया ( Rohit Sharma Statement ) दिली.

सामन्यानंतर, रोहित शर्माने 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल आणि 2019 एकदिवसीय विश्वचषक उपांत्य फेरीचा उल्लेख केला आणि फलंदाजांना त्यांची मानसिकता बदलण्याचे आणि गुरुवारसारखे पराभव टाळण्यासाठी सकारात्मक विचार करण्याचे आवाहन केले. शर्माने फलंदाजांच्या आक्रमक वृत्तीबद्दल सांगितले, जूनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या मालिकेपासून ते T20 मध्ये करत आहेत.

...तर फलंदाजांचा आत्मविश्वास वाढेल -

तो म्हणाला, मला वाटतं, हो तुम्ही पाठलाग करू शकतो. जोपर्यंत तुम्ही नीट विचार केला नाही तोपर्यंत ते करणे कठीण होईल. कारण आम्ही अनेक प्रसंगी 20 किंवा 30 धावांच्या आत 3-4 विकेट गमावत आहोत. तो पुढे म्हणाला, "पण अशा परिस्थितीत या खेळाडूंनी सामना पुढे नेला पाहिजे आणि संघाच्या ध्येयाकडे पाहण्यापेक्षा ते त्यांच्या खेळाबद्दल काहीतरी वेगळे शिकू शकतात का ते पहावे अशी आमची ( Rohit Sharma angry with batsmen ) इच्छा आहे." मला वाटते की ते संघाला त्या परिस्थितीतून बाहेर काढू शकले तर त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल.

शर्मा आपल्या गोलंदाजांवर खूश -

रोहित पुढे म्हणाला, तर ही अशी गोष्ट आहे ज्याबद्दल आपण निश्चितपणे बोललो आहोत. परंतु अशा संकटात व्यवस्थापनाची भूमिका अधिक असते हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असते आणि त्यांनी ते मोकळेपणाने बजावले पाहिजे आणि ते दाखवून दिले पाहिजे. मात्र, शर्मा आपल्या गोलंदाजांवर खूश ( Rohit Sharma happy about bowlers ) दिसत होता. गोलंदाजांनी सर्वतोपरी प्रयत्न केल्याचे त्याने कबूल केले. शर्मा म्हणाले, आम्ही खूप चांगली गोलंदाजी केली. गोलंदाजांनी मोईन अली आणि डेव्हिड विली यांची भागीदारी मोडून काढली आणि संघाला 250 धावांपर्यंत रोखण्यात यश मिळविले.

शर्मा म्हणाला, आमच्याकडे गोलंदाजीचे भरपूर पर्याय आहेत, परंतु आम्हाला वाटते की आमच्याकडे फलंदाजीसाठी सर्वोत्तम खेळाडू आहेत. वरच्या फळीतील एकाने शक्य तितक्या वेळ फलंदाजी करावी. तिसऱ्या सामन्यात भारत जोरदार पुनरागमन करेल आणि मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल, असा विश्वास कर्णधाराने व्यक्त केला. मालिकेतील अंतिम सामना 17 जुलै रोजी मँचेस्टर येथे खेळवला जाईल.

हेही वाचा - Babar Azam Support Kohli : बाबर आझमने केले कोहलीचे समर्थन; म्हणाला....!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.