ETV Bharat / sports

Rohit Sharma : पत्नी रितिकासाठी रोहित शर्माने चक्क समुद्रात मारली उडी!, जाणून घ्या कारण.. - RITIKA SAJDEH MOBILE

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या पत्नी रितिका सजदेह आणि मुलगी समायरासोबत सुट्टीचा आनंद घेत आहे. या दरम्यान रितिकासोबत एक अशी घटना घडली की, रोहितने तिच्यासाठी काहीही विचार न करता चक्क समुद्रात उडी घेतली.

Rohit Sharma
रोहित शर्मा
author img

By

Published : Jun 16, 2023, 8:47 PM IST

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर बीसीसीआयने भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंना जवळपास महिनाभर विश्रांती दिली आहे. आता टीम इंडियाचे सर्व खेळाडू या सुट्टीचा आनंद घेत आहेत.

रोहितच्या पत्नीने शेअर केला व्हिडिओ : कर्णधार रोहित शर्माही सध्या त्याची पत्नी रितिका सजदेह आणि मुलगी समायरासोबत क्वालिटी टाइम स्पेंड करत आहे. रोहित आणि त्याची पत्नी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. अलीकडेच रितिका सजदेहने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून रोहितचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

पत्नीचा फोन वाचवण्यासाठी घेतली समुद्रात उडी : रोहित शर्माचा हा व्हिडिओ शेअर करत रितिकाने म्हटले आहे की, माझा फोन समुद्रात पडला होता. तो वाचवण्यासाठी रोहितने समुद्रात उडी घेतली. रोहित सध्या सुट्टीवर असला तरी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर रोहितला टीकेला सामोरे जावे लागले आहे. त्याच्या कर्णधारपदावरही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याच्याकडून कर्णधारपद हिरावून घेतले जाऊ शकते, अशीही बातमी आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर झालेल्या पराभवानंतर विराट कोहलीने कर्णधारपद सोडले होते. त्यानंतर रोहित शर्माला प्रत्येक फॉरमॅटसाठी कर्णधार बनवण्यात आले होते.

टीम इंडियाचे वेळापत्रक : भारतीय क्रिकेट संघ 12 जुलै ते 13 ऑगस्ट या कालावधीत वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे. जिथे टीम इंडिया 2 कसोटी, 3 वनडे आणि 5 टी - 20 सामने खेळणार आहे. यानंतर 31 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर या कालावधीत आशिया चषक 2023 हायब्रीड मॉडेलवर पाकिस्तान आणि श्रीलंका येथे आयोजित केला जाणार आहे. आशिया चषकासाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार नसून भारताचे सर्व सामने श्रीलंकेत होणार आहेत.

हे ही वाचा :

  1. Rishabh Pant Walking Video : ऋषभ पंत करत आहे टीम इंडियात पुनरागमनाच्या तयारीसाठी मेहनत; शेअर केला व्हिडिओ
  2. Arjun Tendulkar NCA Camp : अर्जुन तेंडुलकरसह 20 युवा खेळाडूंची NCA च्या शिबिरासाठी निवड
  3. WTC Final : रोहित शर्माने पराभवाचे खापर फलंदाजांवर फोडले, जाणून घ्या काय म्हणाला..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.