बंगळुरु : भारत विरुद्ध श्रीलंका ( India v Sri Lanka ) संघात कसोटी मालिकेतील दुसरा म्हणजेच पिंक बॉल कसोटी ( Pink Ball Test ) खेळला जात आहे. आज या सामन्याचा दुसरा दिवस आहे. तसेच या सामन्यातील दोन्ही संघाचे पहिले डाव खेळले गेले आहेत. त्याचबरोबर भारतीय संघाने आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली आहे. ज्यामध्ये खेळताना भारतीय यष्टीरक्षक आणि फलंदाज रिषभ पंतने एका खास विक्रमाला गवसणी घातली आहे.
-
FIFTY!@RishabhPant17 surpasses Kapil Dev to score the fastest 50 by an Indian in Test cricket. It has come off 28 deliveries.
— BCCI (@BCCI) March 13, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Take a bow, Rishabh 👏💪💥
Live - https://t.co/t74OLq7xoO #INDvSL @Paytm pic.twitter.com/YcpJf2sp2H
">FIFTY!@RishabhPant17 surpasses Kapil Dev to score the fastest 50 by an Indian in Test cricket. It has come off 28 deliveries.
— BCCI (@BCCI) March 13, 2022
Take a bow, Rishabh 👏💪💥
Live - https://t.co/t74OLq7xoO #INDvSL @Paytm pic.twitter.com/YcpJf2sp2HFIFTY!@RishabhPant17 surpasses Kapil Dev to score the fastest 50 by an Indian in Test cricket. It has come off 28 deliveries.
— BCCI (@BCCI) March 13, 2022
Take a bow, Rishabh 👏💪💥
Live - https://t.co/t74OLq7xoO #INDvSL @Paytm pic.twitter.com/YcpJf2sp2H
दुसऱ्या डावात फलंदाजी करायला आलेलल्या रिषभ पंतने ( Batsman Rishabh Pant ) भारतीय संघाचा पडझड थांबवताना एका अनोख्या विक्रमला गवसणी घातली आहे. रिषभने फक्त 28 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याचबरोबर त्याने भारताचे महान खेळाडू कपिल देव यांचा कसोटीतील वेगवान अर्धशतकाचा विक्रम मोडीत काढला आहे. तसेच तो भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत अर्धशतक लगावणारा पहिला फलंदाज ठरला आहे. या अगोदर हा विक्रम कपिल देव ( Great all-rounder Kapil Dev ) यांच्या नावावर होता. त्यांनी 1982 साली पाकिस्तान विरुद्ध फक्त 30 चेंडूत अर्धशतक ठोकले होते.
कसोटीत क्रिकेटमध्ये कमी चेंडूत अर्धशतक ठोकणारे भारतीय फलंदाज -
28 चेंडू रिषभ पंत विरुद्ध श्रीलंका - बंगळुरु - 2022
30 चेंडू कपिल देव विरुद्ध पाकिस्तान - कराची - 1982
31 चेंडू शार्दुल ठाकूर विरुद्ध इंग्लंड - ओव्हल - 2021
32 चेंडू विरेंद्र सेहवाग विरुद्ध इंग्लंड - चेन्नई - 2008
कसोटीत क्रिकेटमध्ये कमी चेंडूत अर्धशतक ठोकणारे खेळाडू -
26 चेंडू शाहिद आफ्रिदी विरुद्ध - भारत बेंगळुरू 2005
28 चेंडू इयान बोथम विरुद्ध - भारत 1981
28 चेंडू ऋषभ पंत विरुद्ध - श्रीलंका बंगळुरू 2022*
31 चेंडू ए रणतुंगा विरुद्ध - भारत 1986
-
That's the Dinner break on Day 2 of the 2nd Test.#TeamIndia have a huge lead of 342 runs.
— BCCI (@BCCI) March 13, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Scorecard - https://t.co/loTQPg3SYl #INDvSL @Paytm pic.twitter.com/c1p1JQ7bwy
">That's the Dinner break on Day 2 of the 2nd Test.#TeamIndia have a huge lead of 342 runs.
— BCCI (@BCCI) March 13, 2022
Scorecard - https://t.co/loTQPg3SYl #INDvSL @Paytm pic.twitter.com/c1p1JQ7bwyThat's the Dinner break on Day 2 of the 2nd Test.#TeamIndia have a huge lead of 342 runs.
— BCCI (@BCCI) March 13, 2022
Scorecard - https://t.co/loTQPg3SYl #INDvSL @Paytm pic.twitter.com/c1p1JQ7bwy
त्याचबरोबर भारतीय संघाने आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली. सलामी फलंदाज रोहित शर्मा ( Opener Rohit Sharma ) आणि मयंक अग्रवाल यांनी पहिल्या गड्यासाठी 41 धावांची भागीदारी केली. त्यानंतर मयंक अग्रवाल (22) लसिथ एम्बुल्डेनियाचा बळी ठरला. त्यानंतर रोहित शर्माने 79 चेंडूत 46 धावांचे योगदान देत तंबूत परतला. त्याला धनंजय डी सिल्वाने माघारी धाडले. तसेच हनुमा विहारी देखील रोहित प्रमाणे 79 चेंडूचा सामना करताना 35 धावा केल्या. त्याला जय विक्रमाने बाद करत तंबूत पाठवले. त्यानंतर रिषभ पंतने वेगवान विक्रमी शतक लगावत 50 धावांचे योगदान दिले.
त्यामुळे भारतीय संघाची धावसंख्या 52 षटकानंतर 5 बाद 216 झाली आहे. सध्या रविंद्र जडेजा आणि श्रेयस अय्यर धावपट्टीवर उपस्थित आहेत. तसेच हे दोघे अनुक्रमे 15 आणि 29 धावांवर खेळत आहेत. श्रीलंकेकडून गोलंदाजी करताना प्रविन जयविक्रमाने तीनविकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर धनंजय डिसिल्वा आणि एम्बुल्डेनियाने प्रत्येकी एक विकेट्स घेतली आहे.