ETV Bharat / sports

Ranji Trophy Delhi Vs Mumbai: 'दरवेळी खेळाडू चांगली कामगिरी करेल असे नाही', रणजीच्या सामन्यापूर्वी अजिंक्य रहाणेकडून पाठराखण - मुंबई संघातील खराब कामगिरी करणारे खेळाडू

दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियममध्ये रणजी ट्रॉफीचा आज पहिला सामना दिल्ली विरुद्ध मुंबई संघांमध्ये सुरु झाला आहे. मंगळवारी सकाळी नाणेफेक जिंकल्यानंतर, दिल्लीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तत्पूर्वी मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने संघातील खेळाडूंची पाठराखण केली असून, चांगली कामगिरी न करणाऱ्यांच्या खांद्यावर आपल्याला हात ठेवावा लागेल, असे तो सामन्यापूर्वी म्हणाला.

Ajinkya Rahane
अजिंक्य रहाणे
author img

By

Published : Jan 17, 2023, 12:23 PM IST

नवी दिल्ली: रणजी ट्रॉफी स्पर्धेत दिल्लीचा कर्णधार यश धुल ताप असल्याने बाहेर पडला आहे. दिल्लीने त्यांच्या गट ब रणजी ट्रॉफी सामन्यात मुंबई विरुद्ध हिम्मत सिंग याला कर्णधार म्हणून जबाबदारी दिली आहे. टूर्नामेंटमध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा, ध्रुव शौरीला खेळाच्या पूर्वसंध्येला उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या हंगामातील पाच सामन्यांनंतर, दिल्ली आठ सांघिक गटात सातव्या स्थानावर आहे, त्यांना उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळण्याची आशा नाही.

मुंबईची चांगली वाटचाल सुरु: दुसरीकडे, मुंबईने पाच सामन्यांत तीन विजयांसह सामन्यात पुढे चांगली वाटचाल केली आहे. मुंबई संघ गुणतालिकेत सौराष्ट्रपेक्षा तीन क्रमांकाने पिछाडीवर आहे. आसामविरुद्ध डावाने विजय मिळविल्यानंतर मुंबईने पुढच्या सामन्यात प्रवेश केला. मुंबईला सलग दुसऱ्या सामन्यात सलामीवीर यशस्वी जैस्वालला घेता आलेले नाही. मात्र पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणेचा फॉर्म आणि सर्फराज खानची संघातील उपस्थिती यामुळे त्यांना सामन्यातून मोठ्या आशा आहेत.

मुंबई, मुंबईप्रमाणे खेळेल: सामन्यापूर्वी मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने माध्यमांशी संवाद साधला. 'साहजिकच, मुंबई मुंबईप्रमाणेच खेळेल. पण आमचे लक्ष एकावेळी एकच खेळ खेळण्यावर असते. भूतकाळात जे झाले, ते गेले. प्रत्येक गेमसाठी नवीन सुरुवात करा आणि मागील गेममधून आत्मविश्वास घ्या. तसेच, आम्ही आमच्या प्रतिस्पर्ध्यांचा आदर करतो आणि आमच्या ताकदीनुसार खेळतो,' असे रहाणे दिल्लीविरुद्धच्या लढतीपूर्वी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाला.

दिल्लीला हलक्यात घेत नाही- रहाणे : 'आम्ही त्यांना हलके घेत नाही. दिल्ली हा संघ खूप चांगला आहे आणि मुंबई-दिल्ली खेळ नेहमीच चांगला असतो. आमच्या खेळाच्या योजनांवर लक्ष केंद्रित करणे आणि एकमेकांना पाठीशी घालणे महत्वाचे आहे, तो पुढे म्हणाला. केवळ पृथ्वीच नाही तर सरफराज खान, मुशीर आणि यशस्वी जैस्वाल यांच्यासारखे खेळाडू या हंगामात मुंबईची फलंदाजी मजबूत करत आहेत. पण सगळे दिवस चांगले असतीलच असे नाही. काही दिवस खराबही असतात. पण त्यांना काळजी करण्याची गरज नाही. कारण कर्णधार रहाणेने माध्यमांशी बोलत असताना त्यांची पाठराखण केली आहे.

जुना अजिंक्य बनण्याचा प्रयत्न: रहाणे म्हणाला की, 'मी जुन्या काळाचा विचार करत होतो आणि जेव्हा मी पहिल्यांदा रणजी संघात आलो होतो. मी कसे खेळायचो, माझी विचार पद्धत काय होती? मी ड्रॉईंग बोर्डवर परत आलो आहे आणि मी माझ्या सुरुवातीच्या काळात असलेला अजिंक्य बनण्याचा प्रयत्न करत आहे.' दरम्यान, कर्णधार धुलच्या अनुपस्थितीत, मागील सामन्यात आंध्रविरुद्ध शतक झळकावणारा मधल्या फळीतील फलंदाज हिम्मत सिंग दिल्लीचे नेतृत्व करेल तर सलामीवीर ध्रुव शौरी त्याचा उपकर्णधार असेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.