कराची - पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू अब्दुल रझाकने पाकिस्तान क्रिकेट संघाबाबत मोठं भाष्य केलं आहे. त्याने, पाकिस्तान संघ लवकरच क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमध्ये प्रथम किंवा दुसर्या क्रमांकावर असेल. पाकिस्तानच्या संघाने तिन्ही फॉर्मेटमध्ये त्यांचा खेळ सुधारला असून फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांत सुधारणा झाली आहे, असे म्हटलं आहे.
रझाक म्हणाला, 'दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि इंग्लंड यांसारख्या संघांकडे पाहावे लागेल, जे आत्ता आपल्यासारखे संघ बनवत आहेत. दक्षिण आफ्रिकेचा संघ कसा कमकुवत झाला, हे आपण पाहिले आहे. परंतु पाकिस्तानचा संघ त्या स्थितीत नाही. आमची फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांत सुधारणा झाली आहे.'
माझ्या मते, आयसीसी क्रमवारीत जर तुम्हाला पहिले किंवा दुसरे स्थान मिळवायचे असेल, तर तुम्हाला तिन्ही विभागात चांगली कामगिरी करावी लागेल. २० वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने ऑस्ट्रेलियाचा संघ डॉमिनेट करत होता. मला आशा आहे, की ज्या प्रकारे गोष्टी चालू आहेत, ती पाहता, पाकिस्तानचा संघ तिन्ही फॉर्मेटमध्ये प्रथम किंवा दुसरे स्थान मिळवेल, असे देखील रझाक म्हणाला. दरम्यान, सद्यघडीला पाकिस्तान संघ एकदिवसीयमध्ये सहाव्या, टी-२० मध्ये चौथ्या आणि कसोटीत पाचव्या स्थानावर आहे.
हेही वाचा - आता चूक नको; इंग्लंड दौऱ्यासाठी BCCIने आखला 'हा' प्लॅन
हेही वाचा - करीनाच्या गाण्यावर प्राचीचा भन्नाट बेली डान्स; फिदा झालेला पृथ्वी शॉ म्हणाला 'कातिलाना'