नागपूर : नागपूर शहर पोलिसांनी नुकतेच एक भन्नाट ट्विट ( Nagpur city police tweet ) केले आहे. या ट्विटची चर्चा आज शहरभर सुरू आहे. नागपूर पोलिसांनी भारतीय क्रिकेटपटू महेंद्र सिंग धोनीच्या बदलत्या विविध लूक मधील चार फोटो ट्विट करत, नागरिकांनी सुद्धा अश्याच प्रकारे आपला बँक पासवर्ड बदलत रहावा. असा सल्ला दिला आहे. नेटकाऱ्यांना देखील हे भन्नाट ट्विट आवडले असून त्यावर लाईक्स आणि कमेंट करण्यास सुरूवात केली आहे.
सायबर गुन्हेगार विविध प्रकारचे आर्थिक प्रलोभने ( Rising cyber crime ), आमिष आणि भीती दाखवून नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढतात. त्यानंतर आर्थिक फसवणूक करत असल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. सायबर गुन्हेगार विशेषतः जेष्ठ नागरिक आणि बँक व्यवहारांच्या संदर्भात अज्ञान असलेल्या लोकांची फसवणूक सहजरीत्या करतात, असे दिसून आले आहे. अशा लोकांना सायबर गुन्हेगारांन पासून वाचवण्यासाठी नागपूर शहर पोलीस सातत्याने विविध रोचक ट्विटच्या माध्यमातून जनजागृती करत आहे. नुकतेच नागपूर पोलिसांनी भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीच्या नवनवीन लूक ( Cricketer Mahendra Singh Dhoni new look ) मधील विविध फोटो ट्विट करत, नेहमी आपला पासवर्ड बदलत राहा असा सल्ला दिला आहे. ज्या प्रमाणे माही आपला लूक सातत्याने बदलत असतो, त्याच प्रमाणे तुम्ही देखील आपला पासवर्ड बदलत रहा. जेणेकरून तुमची आर्थिक फसवणूक होणार नाही असं सुचवण्यात आले आहे.
-
Always choose Different Passwords for Different Accounts.
— Nagpur City Police (@NagpurPolice) March 6, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Be the #ThalaivaOfCyberSafety using #MSD technique: pic.twitter.com/LoREl4MIEr
">Always choose Different Passwords for Different Accounts.
— Nagpur City Police (@NagpurPolice) March 6, 2022
Be the #ThalaivaOfCyberSafety using #MSD technique: pic.twitter.com/LoREl4MIErAlways choose Different Passwords for Different Accounts.
— Nagpur City Police (@NagpurPolice) March 6, 2022
Be the #ThalaivaOfCyberSafety using #MSD technique: pic.twitter.com/LoREl4MIEr
आगळे वेगळे ट्विट असतात चर्चेत -
-
That moment when you receive a FREE BUMPER PRIZE link on your WhatsApp :
— Nagpur City Police (@NagpurPolice) February 11, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Be the #PushparajOfCyberSafety @alluarjun #DoNotClickThem pic.twitter.com/7wJxW2JjIJ
">That moment when you receive a FREE BUMPER PRIZE link on your WhatsApp :
— Nagpur City Police (@NagpurPolice) February 11, 2022
Be the #PushparajOfCyberSafety @alluarjun #DoNotClickThem pic.twitter.com/7wJxW2JjIJThat moment when you receive a FREE BUMPER PRIZE link on your WhatsApp :
— Nagpur City Police (@NagpurPolice) February 11, 2022
Be the #PushparajOfCyberSafety @alluarjun #DoNotClickThem pic.twitter.com/7wJxW2JjIJ
आगळे-वेगळे आणि तेवढेच लक्षवेधक आणि क्रिएटिव्ह ट्विट करून लोकांची जनजागृती करण्याचा प्रयत्न नागपूर शहर पोलीस नेहमीच करत असतात. ज्वलंत विषयाला अनुसरून नागरिकांना विविध गुन्हे विषयक माहिती देऊन, त्यांचे गुन्हा घडण्यापासून संरक्षण करण्याचं काम नागपूर पोलीस ट्विटरच्या ( Nagpur Police Twitter ) माध्यमातून करत आहेत. दैनंदिन जीवनात लोकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी ट्विटरचा अतिशय योग्य उपयोग सुरू केला आहे. नागपूर पोलिसांनी गेल्या महिन्यात केलेल्या एका ट्विटची संपूर्ण नागपुरात चर्चा झाली. सायबर गुन्हेगार विविध लिंक पाठवून लोकांची आर्थिक फसवणूक करत असल्याच्या घटना वाढत असल्याने नागपूर पोलिसांनी पुष्पा चित्रपटाच्या पोस्टरचा आधार घेत "मी लिंक उघडणार नाही" असं ट्विट केलं होतं.