मुंबई - सचिन तेंडुलकरला गोलंदाजी करताना भीती वाटत नव्हती, असा खुलासा श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन याने केला. पण विरेंद्र सेहवाग आणि ब्रायन लारा यांना गोलंदाजी करताना भीती वाटायची, अशी कबुली देखील मुरलीधरन याने दिली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणारा मुरलीधरन म्हणाला, सद्यघडीला भारतीय कर्णधार विराट कोहली आणि पाकिस्तानचा बाबर आझम हे माझ्या गोलंदाजीचा सामना चांगला सामना करू शकतील.
मुरलीधरन एका मुलाखतीमध्ये म्हणाला की, सचिनला गोलंदाजी करताना मला भीती वाटत नव्हती. कारण तो खूप आक्रमक फटके मारत नव्हता. याविरुद्ध विरेंद्र सेहवाग होता. तो मोठे फटके खेळण्यात पटाईत होता. पण सचिन आपली विकेट राखून ठेवण्यात माहिर होता. तो चेंडूचा योग्य टेकनिकने सामना करत होता.
कसोटीत 800 हून अधिक विकेट घेणारा मुरलीधरन म्हणाला, माझ्या करियरमध्ये मला वाटलं की, ऑफ स्पिन गोलंदाजी, सचिनची दुबळी बाजू आहे. तो लेग स्पिनवर जोरदार प्रहार करत असे. पण ऑफ स्पिन खेळताना त्याला थोडीशी अडचण येत होती. कारण मी त्याला अनेकदा बाद केलं आहे. याशिवाय अनेक ऑफ स्पिनरचा तो बळी ठरला आहे. हे मी खूप वेळा पाहिलं आहे.
मी या विषयावर सचिनशी कधी बोललो नाही. मला वाटत की, ही त्याची थोडीशी दुबळी बाजू होती. पण सचिनला बाद करणे सोपी बाब नसायची, अशी कबुली देखील मुरलीधरन याने दिली. मुरलीधरन याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 530 गडी बाद केले. त्याने त्याच्या कारकिर्दीत सचिनला 13 वेळा बाद केलं आहे.
सेहवाग आणि ब्रायन लारा यांचे कौतुक करताना मुरलीधरन म्हणाला, मी माझ्या करियरमध्ये ज्या फलंदाजांना गोलंदाजी केली त्यामध्ये विरेंद्र सेहवाग आणि ब्रायन लारा हे धोकादायक फलंदाजच होते. सेहवाग तर खूपच धोकादायक होता. त्याच्यासाठी आम्ही सीमारेषेवर क्षेत्ररक्षक लावायचो. कारण आम्हाला कल्पना आहे असायची की तो, मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करेल.
हेही वाचा - अफगाण फुटबॉलपटूच्या मृत्यू : त्याला पायांनी रचायचा होता इतिहास, पण तालिबानच्या दहशतीने संपले आयुष्य
हेही वाचा - नीरज चोप्राचे नाव पुण्यातील स्टेडियमला देण्यात येणार, राजनाथ सिंह घोषणा करण्याची शक्यता